रशियासाठी लढत होता २२ वर्षांचा भारतीय तरुण; युक्रेनच्या सैन्यानं पकडलं! व्हिडीओतून समोर आलं धक्कादायक सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 10:01 IST2025-10-08T10:01:30+5:302025-10-08T10:01:49+5:30

युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. युक्रेनी सैन्याने मंगळवारी २२ वर्षांच्या एका भारतीय नागरिकाला पकडल्याचा दावा केला आहे.

22-year-old Indian youth was fighting for Russia; Captured by Ukrainian army! Shocking truth revealed in video | रशियासाठी लढत होता २२ वर्षांचा भारतीय तरुण; युक्रेनच्या सैन्यानं पकडलं! व्हिडीओतून समोर आलं धक्कादायक सत्य

रशियासाठी लढत होता २२ वर्षांचा भारतीय तरुण; युक्रेनच्या सैन्यानं पकडलं! व्हिडीओतून समोर आलं धक्कादायक सत्य

युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. युक्रेनी सैन्याने मंगळवारी २२ वर्षांच्या एका भारतीय नागरिकाला पकडल्याचा दावा केला आहे. हा तरुण रशियन सैन्याकडून लढत होता, असे युक्रेनी सैन्याचे म्हणणे आहे. पकडलेला हा तरुण गुजरातमधील मोरबी येथील असून, त्याचे नाव मजोती साहिल मोहम्मद हुसैन आहे. विशेष म्हणजे, हा तरुण रशियातील एका विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी गेला होता.

तुरुंग टाळण्यासाठी रशियन सैन्यात भरती

युक्रेनी सैन्याच्या ६३ व्या मॅकेनाइज्ड ब्रिगेडने साहिलचा एक कथित व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओमध्ये साहिलने स्वतःच मोठा खुलासा केला आहे. रशियन भाषेत बोलताना त्याने सांगितले की, त्याला ड्रग्ज संबंधित आरोपांखाली रशियन तुरुंगात सात वर्षांची शिक्षा झाली होती.

"मला तुरुंगात राहायचे नव्हते, म्हणून मी विशेष लष्करी कारवाईसाठी करार स्वाक्षरी केला. तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी माझ्याकडे तोच एक पर्याय होता," असे साहिलने व्हिडीओमध्ये स्पष्ट केले आहे. याचा अर्थ साहिलला तुरुंगातील शिक्षा टाळण्यासाठी रशियन सैन्यात भरती होण्यास भाग पाडण्यात आले.

१८ दिवसांनी युक्रेनी सैन्यासमोर केले आत्मसमर्पण

साहिलने दिलेल्या माहितीनुसार, अवघ्या १६ दिवसांच्या ट्रेनिंगनंतर १ ऑक्टोबरला त्याला पहिल्या लढाईच्या मिशनवर पाठवण्यात आले. तेथे तो तीन दिवस होता. पुढे त्याने सांगितले की, जेव्हा त्याचे कमांडरसोबत भांडण झाले, तेव्हा त्याने युक्रेनी सैन्यासमोर आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला.

व्हिडीओमध्ये साहिलने सांगितले की, "मी रशियन सैन्यापासून २-३ किलोमीटर दूर एका युक्रेनी खंदकात पोहोचलो आणि माझी रायफल खाली ठेवली. मी युक्रेनी सैनिकांना सांगितले, 'मला लढायचे नाही, मला मदत हवी आहे... मला रशियात परत जायचे नाही. यात काही अर्थ नाही... मला इथे तुरुंगात जाणे आवडेल." साहिलने असाही दावा केला की त्याला रशियन सैन्यात सामील होण्यासाठी पैसे देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, पण त्याला ते कधीच मिळाले नाहीत.

भारत सरकारकडून तपास सुरू

दरम्यान, या वृत्ताची सत्यता पडताळण्यासाठी कीवमधील भारतीय दूतावास तपास करत आहे. या संदर्भात युक्रेनने अद्याप भारताला कोणतीही औपचारिक माहिती दिलेली नाही.

रशियन सैन्यात किती भारतीय?

यापूर्वीही नोकरी किंवा संधींचे आमिष दाखवून अनेक भारतीयांना रशियात नेण्यात आले आणि नंतर त्यांना रशियन सैन्यात भरती होण्यास भाग पाडल्याच्या बातम्या आल्या आहेत. जानेवारी २०२४मध्ये सरकारने १२६ भारतीय नागरिक रशियन सैन्यात असल्याची माहिती दिली होती. यापैकी ९६ लोक भारतात परतले, १२ जणांचा मृत्यू झाला आणि १६ जण अजूनही बेपत्ता आहेत.

२६ सप्टेंबर रोजी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले होते की, "अलीकडे आम्हाला कळले आहे की आणखी काही भारतीय नागरिकांना रशियन सैन्यात भरती केले गेले आहे. ही माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून मिळाली आहे." जयस्वाल यांनी स्पष्ट केले की, भारत सरकारने मॉस्कोच्या अधिकाऱ्यांसमोर हा मुद्दा गांभीर्याने उपस्थित केला आहे आणि सुमारे २७ भारतीयांना तातडीने सोडण्याची मागणी केली आहे.

Web Title : रूस के लिए लड़ रहा भारतीय युवक यूक्रेन में पकड़ा गया; चौंकाने वाला सच सामने आया

Web Summary : 22 वर्षीय भारतीय साहिल को यूक्रेन की सेना ने रूस के लिए लड़ते हुए पकड़ा। ड्रग्स के आरोप में रूसी जेल की सजा से बचने के लिए वह सेना में शामिल हो गया। 18 दिनों बाद उसने आत्मसमर्पण कर दिया, रूस लौटने से बचने के लिए मदद मांगी। भारतीय दूतावास जांच कर रहा है।

Web Title : Indian Fighting for Russia Captured in Ukraine; Shocking Truth Revealed

Web Summary : A 22-year-old Indian, Sahil, was captured by Ukrainian forces while fighting for Russia. Facing a Russian prison sentence for drug charges, he joined the military to avoid jail. He surrendered after 18 days, seeking help to avoid returning to Russia. Indian embassy is investigating.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.