शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

वजनाला आहे २२ टन, मिनिटाला डागते २० गोळे...; अमेरिकेने इराणी जहाजावर हल्ला केला ती MK 45 गन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 13:21 IST

US Navy vs Iran ship MV Tuska: अरबी समुद्रात इराणच्या जहाजावर अमेरिकेचा हल्ला! MK 45 तोफेने इंजिन रूम उडवला; वाचा काय आहे 'यूएसएस स्प्रूएन्स'ची शक्ती.

अरबी समुद्रात अमेरिकन नौदलाने १९ एप्रिल रोजी इराणविरोधात मोठी लष्करी कारवाई केली आहे. अमेरिकेचा 'गाइडेड मिसाइल डेस्ट्रॉयर' यूएसएस स्प्रूएन्सने इराणच्या 'एमव्ही तूस्का' या जहाजाला अमेरिकन नाकेबंदी तोडल्याबद्दल रोखले. सहा तास ताकीद देऊनही जहाज न थांबल्याने, अमेरिकेने आपल्या MK 45 या तोफेने जहाजाच्या इंजिन रूमवर थेट हल्ला केला आणि जहाज आपल्या ताब्यात घेतले.

कारवाईचा थरार: नेमकं काय घडलं?इशाऱ्याकडे दुर्लक्ष: 'एमव्ही तूस्का' हे २७ किमी प्रतितास वेगाने इराणच्या 'बंदर अब्बास' बंदराकडे जात होते. अमेरिकन सैन्याने अनेकदा इशारे दिले, मात्र जहाजावरील कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.अचूक नेम: स्प्रूएन्सने प्रथम जहाजाचा इंजिन रूम रिकामा करण्याचा आदेश दिला आणि त्यानंतर आपल्या ५-इंच MK 45 गनमधून अनेक राऊंड फायर केले. यामुळे जहाजाची गती थांबली.ताबा: इंजिन निकामी होताच, अमेरिकेच्या ३१ व्या मरीन एक्स्पेडिशनरी युनिटच्या मरीन सैनिकांनी जहाजावर बोर्डिंग केले आणि ते आपल्या ताब्यात घेतले.

MK 45 गन: ज्यामुळे ही कारवाई ठरली यशस्वीMK 45 ही अमेरिकन नौदलाची अत्यंत विश्वासार्ह आणि आधुनिक तोफ आहे. या कारवाईत तिने आपल्या अचूकतेची चुणूक दाखवून दिली.

काय आहे वैशिष्ठ्य?ही ५-इंच (१२७ मिमी) कॅलिबरची तोफ पूर्णपणे स्वयंचलित आहे. तोफेच्या ठिकाणी कोणताही माणूस नसतो, तर खालील डेकवरून ६ लोकांची टीम रिमोटद्वारे ती चालवते. या तोफेने 'तूस्का'च्या इंजिन रूमला इतका अचूक निशाणा लावला की, जहाजाला मोठी आग लागली नाही किंवा कोणीही जखमी झाले नाही. केवळ त्याचे इंजिन निकामी झाले. ही तोफ प्रति मिनिट १६ ते २० गोळे डागू शकते. साध्या गोळ्याने ती २४ किमी दूरपर्यंत मार करू शकते. तिचे एकूण वजन सुमारे २२ टन आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : US Navy Halts Iranian Ship with Powerful MK 45 Gun

Web Summary : The US Navy intercepted an Iranian ship, MV Tuska, for violating sanctions. After warnings were ignored, the USS Sprueance disabled the ship's engine room with its MK 45 gun. The MK 45, a 22-ton, rapid-fire naval gun, proved crucial in the operation, firing 16-20 rounds per minute.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणAmericaअमेरिका