अमेरिकेत भारतीय वंशाच्या 'सुपरस्टार' विद्यार्थिनीचा बळी; टेक्सासमधील अंदाधुंद गोळीबारात सविथा शनचा अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 19:29 IST2026-03-04T19:26:49+5:302026-03-04T19:29:32+5:30

टेक्सासमध्ये अंदाधुंद गोळीबार; भारतीय वंशाच्या विद्यार्थिनीसह चौघांचा मृत्यू, अमेरिका हादरली

21 Year Old Indian American Honors Student Savitha Shan Killed in Austin Mass Shooting | अमेरिकेत भारतीय वंशाच्या 'सुपरस्टार' विद्यार्थिनीचा बळी; टेक्सासमधील अंदाधुंद गोळीबारात सविथा शनचा अंत

अमेरिकेत भारतीय वंशाच्या 'सुपरस्टार' विद्यार्थिनीचा बळी; टेक्सासमधील अंदाधुंद गोळीबारात सविथा शनचा अंत

Savitha Shan: अमेरिकेतील टेक्सास राज्यातील ऑस्टिन शहरात रविवारी पहाटे झालेल्या एका भीषण गोळीबारात २१ वर्षीय भारतीय-अमेरिकन विद्यार्थिनी सविथा शमुगसुंदरम हिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या गोळीबारात एकूण चार जणांचा मृत्यू झाला असून १४ जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे अमेरिकेतील भारतीय समुदायात आणि विशेषतः विद्यार्थी वर्गात मोठी खळबळ माजली आहे.

ऑस्टिनमधील वेस्ट सिक्स्थ स्ट्रीट या गजबजलेल्या परिसरात ब्युफोर्ड्स बॅकयार्ड बीअर गार्डनर बाहेर ५३ वर्षीय नियागा दियाग्ने याने अंदाधुंद गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत हल्लेखोर मारला गेला. या हल्ल्यात सविथासह १९ वर्षीय रायडर हॅरिंग्टन आणि ३० वर्षीय जॉर्ज पेडरसन यांचाही मृत्यू झाला.

कोण होती सविथा शन?

सविथा ही युनिव्हर्सिटी ऑफ एटी टेक्सासमधील एक अत्यंत हुशार आणि सुपरस्टार विद्यार्थिनी म्हणून ओळखली जात होती. ती मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम्स आणि इकॉनॉमिक्स या विषयांत ड्युअल डिग्री घेत होती. मे २०२६ मध्ये तिचे पदवी शिक्षण पूर्ण होणार होते. शिक्षण पूर्ण होण्याआधीच तिची एका मोठ्या नामांकित कंपनीत निवड झाली होती. ती इंडियन स्टुडंट्स असोसिएशनच्या कार्यकारी मंडळावर होती आणि ऑस्टिन तमिळ संगममध्ये स्वयंसेवक म्हणून सक्रिय होती. युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक रसेल फिनी यांनी तिला श्रद्धांजली वाहताना म्हटले की, "सविथा आमच्या कॉलेजमधील एक हुशार विद्यार्थिनी होती. तिला अशा प्रकारे गमावणे अत्यंत वेदनादायक आहे."

हल्लेखोराचा संशयास्पद पेहराव आणि तपास

एफबीआय  या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोर नियागा दियाग्ने याने अंगावर एक स्वेटशर्ट घातला होता, ज्यावर "Property of Allah" असे शब्द आणि इराणच्या झेंड्याचे डिझाइन होते. या हल्ल्यामागे नेमका कोणता हेतू होता, याचा शोध घेण्यासाठी पोलीस १५० हून अधिक साक्षीदारांची चौकशी करत आहेत आणि हजारो तासांचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

भारतीय समुदायावर शोककळा
ऑस्टिनमधील 'सिलिकॉन हिल्स' परिसरात मोठ्या प्रमाणावर भारतीय आयटी प्रोफेशनल्स राहतात. सविथाच्या निधनामुळे या संपूर्ण समुदायावर शोककळा पसरली आहे. स्थानिक भारतीय नेते शन कुटुंबाला आधार देण्यासाठी पुढे सरसावले असून लवकरच सविथाच्या स्मृतीप्रत्यर्थ एका विशेष शोकसभेचे आयोजन केले जाणार आहे

Web Title : टेक्सास गोलीबारी में भारतीय छात्रा की मौत; सविथा शन की मृत्यु

Web Summary : टेक्सास में गोलीबारी में होनहार भारतीय-अमेरिकी छात्रा सविथा शन की दुखद मौत हो गई। इस घटना में तीन अन्य की भी मौत हो गई और चौदह घायल हो गए। पुलिस शूटर के मकसद की जांच कर रही है, उसके पहनावे की जांच कर रही है और गवाहों से पूछताछ कर रही है। भारतीय समुदाय इस विनाशकारी नुकसान पर शोक मना रहा है।

Web Title : Indian Student Killed in Texas Shooting; Savitha Shan Dies

Web Summary : Savitha Shan, a bright Indian-American student, tragically died in a Texas shooting. The incident also killed three others and injured fourteen. Police are investigating the shooter's motives, examining his attire and questioning witnesses. The Indian community mourns this devastating loss.