इराणच्या २०४ सैनिकांना कोलंबोमध्ये हलविले; दक्षता बाळगत श्रीलंकेच्या नौदलाकडून चोख कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 04:34 IST2026-03-07T04:34:20+5:302026-03-07T04:34:48+5:30

कोलंबो : इराणच्या आयआरआयएनएस बुशहर य़ा युद्धनौकेवरील २०८ इराणी नौसैनिकांपैकी २०४ जणांना सुखरूप कोलंबो बंदरात आणण्यात आले. दोन दिवसांपूर्वीच ...

204 Iranian soldiers moved to Colombo; Sri Lankan Navy performs well while maintaining vigilance | इराणच्या २०४ सैनिकांना कोलंबोमध्ये हलविले; दक्षता बाळगत श्रीलंकेच्या नौदलाकडून चोख कामगिरी

इराणच्या २०४ सैनिकांना कोलंबोमध्ये हलविले; दक्षता बाळगत श्रीलंकेच्या नौदलाकडून चोख कामगिरी

कोलंबो : इराणच्या आयआरआयएनएस बुशहर य़ा युद्धनौकेवरील २०८ इराणी नौसैनिकांपैकी २०४ जणांना सुखरूप कोलंबो बंदरात आणण्यात आले. दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या पाणबुडीने श्रीलंकेजवळ एका इराणी युद्धनौकेवर हल्ला केला होता. त्यामुळे दुसऱ्या इराणी युद्धनौकेला हानी पोहोचू नये यासाठी श्रीलंकेने विशेष दक्षता बाळगली.

श्रीलंकन नौदलाचे प्रवक्ते कमांडर बुद्धिका संपत यांनी शुक्रवारी (दि. ६) सांगितले की, आयआरआयएनएस बुशहरच्या एका इंजिनमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे त्याच्या व्यवस्थेसाठी तिथे चार नौसैनिक आहेत. या युद्धनौकेला कोलंबोनजीक असलेल्या ठिकाणाहून त्रिंकोमाली बंदरात पोहोचण्यासाठी आणखी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यावरील नौसैनिकांना वेलिसारा येथील नौदल छावणीत नेले जाणार आहे. त्यांची तिथे वैद्यकीय तपासणीही केली जाईल.

राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांनी गुरुवारी  सांगितले की, इंजिन निकामी झाल्याचे कारण देत आयआरआयएनएस बुशहरने श्रीलंकेच्या सागरी हद्दीत प्रवेश करण्याची परवानगी मागितली होती. त्यांना आम्ही तटस्थ व मानवतावादी दृष्टिकोनातून मदत केली होती. 

Web Title : श्रीलंका ने ईरानी जहाज की मदद की; 204 नाविक कोलंबो में सुरक्षित

Web Summary : श्रीलंका ने अपने तट के पास क्षतिग्रस्त हुए एक ईरानी युद्धपोत की सहायता की, जिससे 204 नाविक कोलंबो में सुरक्षित रूप से उतर सके। जहाज ने इंजन में खराबी के कारण प्रवेश का अनुरोध किया और उसे मानवीय सहायता मिली। नाविकों की चिकित्सा जांच की जाएगी।

Web Title : Sri Lanka Aids Iranian Ship; 204 Sailors Safely in Colombo

Web Summary : Sri Lanka assisted an Iranian warship, damaged near its coast, allowing 204 sailors to disembark safely in Colombo. The ship requested entry due to engine failure and received humanitarian aid. Sailors will undergo medical checks.