'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 13:28 IST2026-04-10T13:28:22+5:302026-04-10T13:28:57+5:30
Operation Roaring Lion : 'ऑपरेशन रोअरिंग लायन'अंतर्गत इस्रायलने इराण विरोधात चालवलेल्या मोहिमेत. १८००० बॉम्ब फेकल्याचा दावा केला आहे...

'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Operation Roaring Lion: इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविराम झाला असला तरी, इस्रायलने मात्र आपले हल्ले सुरूच ठेवलले आहेत. इस्रायलकडून दक्षिण लेबनॉनमध्ये सातत्याने हवाई हल्ले केले जात आहेत. दरम्यान, इस्रायलने गेल्या ४० दिवसांच्या युद्धातइराण आणि लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा आणि टार्गेट केलेल्या ठिकाणांचा अधिकृत अहवालच सादर केला. 'ऑपरेशन रोअरिंग लायन'अंतर्गत इस्रायलने इराण विरोधात चालवलेल्या मोहिमेत. १८००० बॉम्ब फेकल्याचा दावा केला आहे.
IDF ने जारी केलेल्या अहवालानुसार, 'ऑपरेशन रोअरिंग लायन'अंतर्गत इराणमधील ४,००० हून अधिक ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. या मोहिमेदरम्यान इस्रायली हवाई दलाने तब्बल ८५०० हून अधिक उड्डाणे केली, यातील १००० मोहिमा थेट इराणच्या सीमेत शिरून राबवण्यात आल्या. एकूण १०८०० स्ट्राइक पॉइंट्सवर हल्ले करण्यात आले. यात ६७०० हून अधिक इराणच्या लष्करी पायाभूत सुविधांचा समावेश होता. या हल्ल्यांत इराणच्या सैन्य शक्तीचे आणि संरक्षणाचे मोठे नुकसान झाल्याचे इस्रायलने म्हटले आहे.
महत्वाचे म्हणजे, इराण आणि अमेरिका यांच्यात दोन आठवड्यांचा युद्धविराम लागू झाला असून पाकिस्तानमध्ये शनिवारपासून शांतता चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. अमेरिकेने आपल्या १० अटी मान्य केल्याचा दावा करत इराण या युद्धात आपला विजय झाल्याचे सांगत आहे. मात्र, इस्रायलने सादर केलेली ही आकडेवारी इराणवर केवढा मोठा आघात झाला आहे, हे दर्शवते.
याशिवाय, इरामच्या सैन्य शक्तीचे, मिसाइल प्रोडक्शन आणि संरक्षण पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाल्याचा दावाही इस्रायलने केला आहे.