शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

लंडनच्या भुयारी रेल्वेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी 18 वर्षीय तरुणाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2017 16:43 IST

लंडनच्या भुयारी रेल्वेमार्गामध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी 18 वर्षांच्या तरुणाला अटक करण्यात आल्याची माहिती ब्रिटीश पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केंट पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे.

ठळक मुद्देलंडनच्या भुयारी रेल्वेमार्गामध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी 18 वर्षीय तरुणाला अटकअटक करण्यात आलेल्या तरुणाची सध्या चौकशी सुरु आहेदहशतवादाच्या आरोपाखाली ही चौकशी सुरु असून अद्याप त्याची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही.

लंडन, दि. 16 - लंडनच्या भुयारी रेल्वेमार्गामध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी 18 वर्षांच्या तरुणाला अटक करण्यात आल्याची माहिती ब्रिटीश पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केंट पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे. उप-सहाय्यक पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास सध्या सुरु असून, दहशतवादाचा धोका अद्यापही आहे. सुरक्षा यंत्रणांनी अजून एखादा हल्ला होईल अशी शक्यता वर्तवली आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणाची सध्या चौकशी सुरु आहे. दहशतवादाच्या आरोपाखाली ही चौकशी सुरु असून अद्याप त्याची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही. 

दरम्यान इसिसने या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सकाळच्या घाईगडबडीच्या वेळी  भुयारी रेल्वेत झालेल्या स्फोटाने लंडन हादरले. या स्फोटानंतर आग भडकली. त्यात होरपळून व जीव वाचविण्याच्या धावपळीत 29 प्रवासी जखमी झाले. लंडन स्टेशनजवळील भुयारीमार्गातून जाणा-या एक भरगच्च ट्रेनमध्ये स्फोट घडवण्यात आला. यासाठी आयईडी स्फोटकांचा वापर करण्यात आला. यावर्षातील ब्रिटनमध्ये झालेला हा पाचवा दहशतवादी हल्ला आहे. 

हा स्फोट बकेट बॉम्बचाच असल्याचा संशय पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने व्यक्त केला असून, या स्फोटासाठी अद्ययावत स्फोटक उपकरणांचा वापर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. डिस्ट्रिक्ट लाइन ट्रेनच्या मागच्या डब्यातील प्लास्टीकच्या बादलीत हा स्फोट झाला. स्फोटानंतर आग भडकली. स्फोटाच्या ठिकाणी तेलकट रासायनिक पदार्थाचे ओघळ दिसून आले. स्फोटामुळे प्रवाशांत घबराट पसरली. प्रवाशांची ट्रेनमधून बाहेर पडण्याची धडपड चालू होती. अनेकांचे चेहरे होरपळले.

पार्सन्स ग्रीन स्टेशनवर भुयारी रेल्वे पोहोचण्याआधी स्टेशनवर उतरण्यासाठी प्रवासी दरवाज्याजवळ पोहोचले होते. याच ट्रेनची वाट पाहत फलाटावर प्रवाशांची नेहमीप्रमाणे गर्दी होती. प्रवाशांची जीव वाचविण्यासाठी धडपड चालू होती. या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले. दहशतवादविरोधी पथकाने पार्सन्स ग्रीन स्टेशनकडे धाव घेऊ न या प्रकाराची चौकशी सुरू केली. घटनास्थळी शहर पोलीस सेवा, ब्रिटिश वाहतूक पोलीस आणि लंडन अग्निशमन पथकासोबत रुग्णवाहिका सेवा पथकाने मदत व बचाव कार्य सुरू केले. या ट्रेनने बव्हंशी नोकरदार व विद्यार्थी प्रवास करतात. पंतप्रधान तेरेसा मे यांनी घटनेची माहिती घेतली. 

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादPoliceपोलिसCrimeगुन्हा