लंडनच्या भुयारी रेल्वेमध्ये स्फोट, १८ जखमी, दहशतवादी हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 01:40 AM2017-09-16T01:40:52+5:302017-09-16T01:42:17+5:30

सकाळच्या घाईगडबडीच्या वेळी वर्दळीच्या भुयारी रेल्वेत झालेल्या स्फोटाने लंडन हादरले. या स्फोटानंतर आग भडकली. त्यात होरपळून व जीव वाचविण्याच्या धावपळीत १८ प्रवासी जखमी झाले. स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. शुक्रवारी सकाळी रेल्वेच्या एका डब्यात स्फोट झाला.

 Bomb explosion in London's suburban railway, 18 injured, terrorist attacks | लंडनच्या भुयारी रेल्वेमध्ये स्फोट, १८ जखमी, दहशतवादी हल्ला

लंडनच्या भुयारी रेल्वेमध्ये स्फोट, १८ जखमी, दहशतवादी हल्ला

Next

लंडन : सकाळच्या घाईगडबडीच्या वेळी वर्दळीच्या भुयारी रेल्वेत झालेल्या स्फोटाने लंडन हादरले. या स्फोटानंतर आग भडकली. त्यात होरपळून व जीव वाचविण्याच्या धावपळीत १८ प्रवासी जखमी झाले. स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. शुक्रवारी सकाळी रेल्वेच्या एका डब्यात स्फोट झाला.
हा स्फोट बकेट बॉम्बचाच असल्याचा संशय पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने व्यक्त केला असून, या स्फोटासाठी अद्ययावत स्फोटक उपकरणांचा वापर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. डिस्ट्रिक्ट लाइन ट्रेनच्या मागच्या डब्यातील प्लास्टीकच्या बादलीत हा स्फोट झाला. स्फोटानंतर आग भडकली. स्फोटाच्या ठिकाणी तेलकट रासायनिक पदार्थाचे ओघळ दिसून आले. स्फोटामुळे प्रवाशांत घबराट पसरली. प्रवाशांची ट्रेनमधून बाहेर पडण्याची धडपड चालू होती. अनेकांचे चेहरे होरपळले.
पार्सन्स ग्रीन स्टेशनवर भुयारी रेल्वे पोहोचण्याआधी स्टेशनवर उतरण्यासाठी प्रवासी दरवाज्याजवळ पोहोचले होते. याच ट्रेनची वाट पाहत फलाटावर प्रवाशांची नेहमीप्रमाणे गर्दी होती. प्रवाशांची जीव वाचविण्यासाठी धडपड चालू होती. या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले. दहशतवादविरोधी पथकाने पार्सन्स ग्रीन स्टेशनकडे धाव घेऊ न या प्रकाराची चौकशी सुरू केली. घटनास्थळी शहर पोलीस सेवा, ब्रिटिश वाहतूक पोलीस आणि लंडन अग्निशमन पथकासोबत रुग्णवाहिका सेवा पथकाने मदत व बचाव कार्य सुरू केले. या ट्रेनने बव्हंशी नोकरदार व विद्यार्थी प्रवास करतात. पंतप्रधान तेरेसा मे यांनी घटनेची माहिती घेतली.

स्टेशनची नाकेबंदी
स्फोट नेमका कशाचा होता आणि आग कशाने भडकली, याचा तपास दहशतवादविरोधी पथक करीत आहे. पार्सन्स ग्रीन स्टेशन रिकामे करून पोलिसांनी चोहोबाजूने स्टेशनला वेढा घालून नाकेबंदी केली आहे. शहर पोलिसांनी सांगितले की, प्लास्टीक बादलीत वा कचरापेटीत हा स्फोट झाला, असे लोक सांगत आहेत. आम्ही तपास करीत आहोत.

Web Title:  Bomb explosion in London's suburban railway, 18 injured, terrorist attacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.