शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
2
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
3
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
4
केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
5
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
6
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."
7
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश
8
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
9
Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया
10
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
11
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
12
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
13
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
14
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
15
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
16
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
17
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
18
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
19
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
20
Dhadak 2: मराठमोळ्या आदित्य ठाकरेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; तृप्ती डिमरीसोबत केली स्क्रीन शेअर

iran israel news: इराणमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना नेमके कधी मायदेशी आणलं जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 08:15 IST

इस्रायलबरोबर संघर्ष सुरू असतानाही इराणने आपल्या देशात अडकून पडलेल्या एक हजार भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी जाता यावे, यासाठी आपली हवाई हद्द खुली केली.

तेहरान : इस्रायलबरोबर संघर्ष सुरू असतानाही इराणने आपल्या देशात अडकून पडलेल्या एक हजार भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी जाता यावे, यासाठी आपली हवाई हद्द खुली केली. भारताशी असलेल्या मैत्रीची जाणीव ठेवत इराणने युद्धाच्या धामधुमीत मानवतावादी निर्णय घेतला. त्याबद्दल या विद्यार्थ्यांनी इराणचे आभार मानले.

सध्या इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय विमानांना इराणच्या हवाई क्षेत्रात प्रवेश करण्यास बंदी आहे. मात्र, त्यास भारताचा अपवाद करण्यात आला. इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी केंद्र सरकार ‘ऑपरेशन सिंधू’ ही मोहीम राबवत आहे. त्याअंतर्गत १७ जून रोजी भारताच्या दूतावासाने इराणमधून ११० विद्यार्थ्यांना रस्त्याने आर्मेनियात नेले. तेथील येरेवन येथून १८ जून रोजी विशेष विमानाने हे विद्यार्थी भारतात रवाना झाले. इराण व इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशात परत आणले जाणार आहे. अडकलेल्या भारतीयांना आता इराणमधील मशहद शहरातून भारतात आणले जाणार आहे.

इराणमधील भारतीय दूतावासातील अधिकाऱ्याने सांगितले की, इराणमधील भारतीयांना आणण्यासाठी गरज पडल्यास सरकार आणखी विमान फेऱ्यांची व्यवस्था करणार आहे. तसेच, तुर्कमेनिस्तानच्या अश्गाबात शहरातूनही एक विमान भारतीयांना घेऊन दिल्लीला येणार आहे. 

नेमके कधी परतणार विद्यार्थी मायदेशी? विद्यार्थ्यांना घेऊन जाणारे एक विमान शुक्रवारी रात्रीपर्यंत भारतात पोहोचेल आणि शनिवारी दुपारपर्यंत दोन विमाने भारतात पोहोचतील. या उड्डाणांची व्यवस्था भारत सरकारने केली आहे. ही उड्डाणे इराणमधील मशहद येथून उड्डाण करतील आणि दिल्लीत उतरतील, अशी माहिती देण्यात आली आहे.

आतापर्यंत युद्धात किती झाले नुकसान?शुक्रवारी इराण आणि इस्रायलमधील युद्धाचा आठवा दिवस होता. सकाळी इराणने इस्रायलच्या बेरशेबा शहरातील मायक्रोसॉफ्ट ऑफिसजवळ बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ला केला. यामुळे अनेक गाड्यांना आग लागली. आजूबाजूच्या घरांचेही नुकसान झाले. आतापर्यंतच्या युद्धात २४ इस्रायली मारले गेले आहेत, तर ६०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्याच वेळी, वॉशिंग्टनस्थित एका मानवाधिकार गटाने दावा केला आहे की, इराणमध्ये मृतांची संख्या आता ६३९ वर पोहोचली आहे आणि १,३२९ जखमी झाले आहेत.

टॅग्स :warयुद्धIranइराणIsraelइस्रायलIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय