गर्दीत वाहन घुसविल्याने चिरडून १० जणांचा मृत्यू, अमेरिकेतील घटना; अतिरेकी हल्ल्याची शंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 11:38 IST2025-01-02T11:36:35+5:302025-01-02T11:38:15+5:30

 हा दहशतवादी हल्ला असल्याचा दावा न्यू ऑर्लेन्सचे महापौर लाटोया कॅन्ट्रेल यांनी केला आहे. एफबीआय त्यादृष्टीने तपास करत आहे.  

10 killed after vehicle ploughs into crowd in US; terror attack suspected | गर्दीत वाहन घुसविल्याने चिरडून १० जणांचा मृत्यू, अमेरिकेतील घटना; अतिरेकी हल्ल्याची शंका

गर्दीत वाहन घुसविल्याने चिरडून १० जणांचा मृत्यू, अमेरिकेतील घटना; अतिरेकी हल्ल्याची शंका

न्यू ऑर्लेन्स : अमेरिकेतील न्यू ऑर्लेन्समधील फ्रेंच क्वार्टर भागामध्ये  नववर्षाच्या स्वागतात मग्न असलेल्या लोकांच्या गर्दीमध्ये एका माथेफिरू चालकाने पिकअप ट्रक घुसविला. बुधवारी पहाटे घडलेल्या या भीषण घटनेत १० जणांचा मृत्यू झाला असून, ३० जण जखमी झाले. त्यानंतर झालेल्या गोळीबारात माथेफिरू  ठार झाला.  हा दहशतवादी हल्ला असल्याचा दावा न्यू ऑर्लेन्सचे महापौर लाटोया कॅन्ट्रेल यांनी केला आहे. एफबीआय त्यादृष्टीने तपास करत आहे.  

न्यू ऑर्लेन्स येथील बॉरबॉन मार्गावर नववर्षाच्या स्वागताला असंख्य लोक जमा झाले होते. त्यांचा जल्लोष सुरू होता. त्याचवेळी एका चालकाने पिकअप ट्रक गर्दीत घुसवला. चालकाने गोळीबार केल्याचेही काही जणांनी सांगितले. घटनास्थळी आयडीसदृश स्फोटक मिळाल्याचेही सांगण्यात आले. चालकाला अनेकांना वाहनाखाली चिरडून मारायचे होते. त्यामुळे त्याने जाणूनबुजून हे कृत्य केले, असेही या तपासयंत्रणेचे मत आहे. 

गोळीबारात दोन पोलिस अधिकारी जखमी
चालकाने पिकअप ट्रकमधून बाहेर आल्यानंतर ज्या दोन पोलिस अधिकाऱ्यांवर गोळीबार झाला, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे एफबीआयने सांगितले. 
 

 

Web Title: 10 killed after vehicle ploughs into crowd in US; terror attack suspected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.