UPSC Topper Ria Dabi : IAS टीना डाबीच्या बहिणीची UPSC मध्ये कौतुकास्पद कामगिरी; पहिल्याच प्रयत्नात नेत्रदीपक भरारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 03:17 PM2021-09-25T15:17:05+5:302021-09-25T15:28:44+5:30

UPSC Topper Ria Dabi : 2015 बॅचच्या IAS टॉपर टीना डाबी यांची छोटी बहीण रिया डाबी हिनेही मोठं यश मिळवलं आहे.

ria dabi upsc 2020 topper air 15 tina dabi younger sister ias sisters success story | UPSC Topper Ria Dabi : IAS टीना डाबीच्या बहिणीची UPSC मध्ये कौतुकास्पद कामगिरी; पहिल्याच प्रयत्नात नेत्रदीपक भरारी

UPSC Topper Ria Dabi : IAS टीना डाबीच्या बहिणीची UPSC मध्ये कौतुकास्पद कामगिरी; पहिल्याच प्रयत्नात नेत्रदीपक भरारी

googlenewsNext

नवी दिल्ली - यूपीएससी परीक्षा 2020 च्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. देशभरात एकूण 761 उमेदवार या परीक्षेत उत्तीर्ण झाले असून, बिहारच्या शुभम कुमारने भारतातून पहिला येण्याचा मान मिळवला आहे. तर, जागृती अवस्थी आणि अंकिता जैन अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या आल्या आहेत. दरम्यान, या परीक्षेत 2015 बॅचच्या IAS टॉपर टीना डाबी यांची छोटी बहीण रिया डाबी (UPSC Topper Ria Dabi) हिनेही मोठं यश मिळवलं आहे. रिया डाबीने या परीक्षेत देशातून 15वा रँक मिळवला आहे. 

IAS टीना डाबी यांनी आपल्या सोशल मीडियावर बहिणीच्या यशाबद्दल माहिती दिली. निकालानंतर रियाने आपला आनंद व्यक्त केला आहे. तसेच आईकडून प्रेरणा मिळाल्याचं आवर्जून सांगितलं आहे. आपल्या दोन्ही मुली IAS ऑफिसर व्हाव्या अशी आईची खूप इच्छा होती. त्यामुळे आता ती खूप खूश असल्याचं सांगितलं आहे. रियाने पहिल्या प्रयत्नात वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी मोठं यश संपादन केलं आहे. रियाने दिलेल्या माहितीनुसार, तिला पेंटिंगची आवड आहे. त्यामुळे स्वत:ला रिलॅक्स करण्यासाठी मी नेहमीच पेंटिंग करते. ज्यामुळे UPSC ची तयारी करताना खूप मदत झाली. 

रियाचं UPSC मध्ये मोठं यश, मिळवला देशातून 15वी येण्याचा मान

रियाची आई हिमानी डाबी यांनी आज आम्हाला खूप अभिमान वाटत आहे. मी माझ्या मुलींना मोठं केलं. त्या दोघींना हे करण्याचा सल्ला दिला होता आणि दोघींनी तिच निवड करून आमचा मान वाढवला आहे. रियाचे वडील जसवंत डाबी यांनी देखील मुलींच्या यशावर गर्व असल्याचं म्हटलं आहे. घरात आनंदाचं वातावरण असून सर्वच जण सेलिब्रेशन करत असल्याचं म्हटलं आहे. रियाने दिल्लीच्या श्रीराम कॉलेजमधून 2019 मध्ये पॉलिटिकल सायन्सध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे. रियाने आपली मोठी बहीण टीना नेहमीच आपल्य़ाला मार्गदर्शन करत असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सहावीत असताना 'असं' काही घडलं की IAS टॉपर शुभमचं आयुष्यच बदललं; 'ती' घटना ठरली टर्निंग पॉईंट

बिहारचा रहिवासी असलेला शुभम कुमार (UPSC Topper Shubham Kumar ) देशातून पहिला आला आहे. आयआयटी मुंबईमधून त्याने (सिविल इंजिनीयरिंग) बीटेकमध्ये पदवी घेतलेल्या शुभमने तिसऱ्या प्रयत्नात अव्वल क्रमांक मिळवला. याआधी त्याने 2018 आणि 2019 मध्ये परीक्षा दिली होती. 2019 मध्ये तो देशात 290 वा आला होता. 24 वर्षांचा शुभम सध्या इंडियन डिफेन्स अकाऊंट सर्व्हिसमध्ये प्रशिक्षण घेत आहे. शुभम सहावीत असताना त्याच्या आयुष्यात घडलेल्या एका घटनेने त्याचं आयुष्यच बदललं आहे. शुभमने आपल्या मुलाखतीतून यशाची रहस्यं उलगडली. 

सहावीत शिकत असताना अशी एक घटना घडली होती की त्यामुळे त्याने कटिहार सोडून पाटणा (Patana) येथे शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला होता. शुभमने "मी सहावीत असताना एका प्रश्नाचं उत्तर योग्य दिलं होतं मात्र एका शिक्षकांनी माझं उत्तर चूक असल्याचं सांगितलं होतं. माझं उत्तर योग्य असल्याची मला खात्री आणि विश्वास होता. शिक्षकांच्या या कृत्यामुळे मी दुःखी झालो आणि तेव्हाच मी शिक्षणासाठी पाटण्याला जायचा मोठा निर्णय घेतला. मला पाटण्याला जाऊन चांगलं शिक्षण घ्यायचं आहे, असं मी माझ्या आई-वडिलांना सांगितलं. त्यांनीही मला विरोध केला नाही. तेव्हाच माझ्या आयुष्याला वळण मिळालं. माझं पुढचं शिक्षण पाटणा आणि बाकीच्या शहरांत झालं. त्याचीच परिणाम म्हणून मला आज हे यश मिळालं आहे" असं म्हटलं आहे. 


 

Web Title: ria dabi upsc 2020 topper air 15 tina dabi younger sister ias sisters success story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.