नोकरी करत करत शेतात पिकवलं ‘सोनं’; वर्षाकाठी २५ लाख कमवतो हा युवा शेतकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 02:38 PM2022-01-10T14:38:44+5:302022-01-10T14:44:52+5:30

तुळजापूरातील मसला खुर्द गावातील सुशिक्षित शेतकरी अँड सोमेश वैद्य व कुटुंबाने कोरोना लॉकडाऊनचा सदुपयोग केला.

Somesh Vaidya, a young farmer, earns Rs 25 lakh Per year from Peru farming | नोकरी करत करत शेतात पिकवलं ‘सोनं’; वर्षाकाठी २५ लाख कमवतो हा युवा शेतकरी

नोकरी करत करत शेतात पिकवलं ‘सोनं’; वर्षाकाठी २५ लाख कमवतो हा युवा शेतकरी

Next

उस्मानाबाद – शेतात काय ठेवलंय? असं काही जण म्हणतात पण याच शेतीत आधुनिक प्रयोग करुन एका युवा शेतकऱ्याने टीकाकारांची बोलती बंद केली आहे. तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द या गावातील या सुशिक्षित शेतकऱ्याने आपल्या मेहनतीच्या बळावर पेरु बागेत यशस्वी उत्पन्न घेतले आहे. अँड. सोमेश वैघ असं या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. १० एकर शेतीतून सोमेशनं वर्षाकाठी २५ लाख रुपयांची कमाई केली आहे. जाणून घेऊया या युवा शेतकऱ्याची यशोगाथा...

कोरोना काळात अनेक उद्योगधंदे, कामं ठप्प झाली. प्रत्येकजण घरात राहूनच मिळेल ते काम करु लागला. तुळजापूरातील मसला खुर्द गावातील सुशिक्षित शेतकरी अँड सोमेश वैद्य व कुटुंबाने कोरोना लॉकडाऊनचा सदुपयोग केला. गेल्या जून २०२० मध्ये गावात ५ एकर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी गावात ५ एकरात थाई ७ आणि पिंक सुपर वाण जातीचा पेरू बाग विकसित करत व्यक्तिश  स्वतः लक्ष घालून लागवड केली होती. गेल्या १८ महिन्यात त्यांनी पेरू बाग अत्यंत चांगली  जोपासली असून ड्रिप सिंचन द्वारे खते व पाणी झाडास उपलब्ध करून अत्यंत योग्य नियोजन द्वारे १० हजार पेरू झाडाचे उत्तम संगोपन केले आहे.

शेताला कायम स्वरूपी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी त्यानी आधुनिक पध्तीने १ एकर मधे शेततळे बांधले असून २ विहिरीद्वारे मुबलक पाणी साठा केला आहे. अत्यंत नियोजनबद्ध केलेल्या शेतीतून त्यांना मेहनतीचं फळ मिळालं. गेल्या तीन महिन्यापासून पेरू उत्पादन सुरू असून आतापर्यंत त्यानी १०० टन पेरू सोलापूर, उस्मानाबाद, लातुर  बेळगाव,अहमदनगर येथील व्यापारी आणि बाजार समितीमध्ये विकून २५ लाख रुपयांचे उत्पादन मिळवले आहे. तसेच सोमेश यांनी केवळ स्वत: शेती उद्योग न करता परिसरातील गरजू व्यक्ती आणि महिलांना नियमित रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे सोमेशचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

कोण आहे सोमेश वैद्य?

सोमेश वैद्य हे गेल्या १५ वर्षापासून मंत्रालयात स्वीय सहायक पदावर कार्यरत असून ते सध्या  भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे मुंबईतील काम पाहतात. पेरू बाग शिवाय सोमेश यांनी त्यांच्या उर्वरित शेतात कोकणातील  जातिवंत  केशर आंबा दोन हजार झाडे आणि सिताफळ बाग लागवड केली असून त्याचे उत्पादन येत्या २ वर्षात मिळेल असंही त्यांनी सांगितले आहे. मात्र लॉकडाऊनचा सदुपयोग करत सोमेशने केलेल्या कामगिरीमुळे ते इतरांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत.

Web Title: Somesh Vaidya, a young farmer, earns Rs 25 lakh Per year from Peru farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app