दहा वर्षे नोकरीची प्रतीक्षा; ‘खेलरत्न’ने दिली हुलकावणी! आता पद्मश्रीने नाराजी दूर, सविता पूनियाची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 06:03 IST2026-01-30T06:03:36+5:302026-01-30T06:03:53+5:30

भारतीय संघात स्थान पटकाविल्यानंतरही दहा वर्षे मी बेरोजगार होते. खेलरत्न पुरस्कारासाठीही वारंवार प्रतीक्षेत राहिल्यानंतर आता पद्मश्री सन्मानाने माझी सर्व नाराजी दूर झाल्याची प्रतिक्रिया महिला हॉकी संघाची दिग्गज गोलकीपर सविता पुनिया हिने व्यक्त केली.

Ten years of waiting for a job; 'Khel Ratna' gave me a job offer! Now Padma Shri has removed my displeasure, Savita Poonia's reaction | दहा वर्षे नोकरीची प्रतीक्षा; ‘खेलरत्न’ने दिली हुलकावणी! आता पद्मश्रीने नाराजी दूर, सविता पूनियाची प्रतिक्रिया

दहा वर्षे नोकरीची प्रतीक्षा; ‘खेलरत्न’ने दिली हुलकावणी! आता पद्मश्रीने नाराजी दूर, सविता पूनियाची प्रतिक्रिया

नवी दिल्ली -  भारतीय संघात स्थान पटकाविल्यानंतरही दहा वर्षे मी बेरोजगार होते. खेलरत्न पुरस्कारासाठीही वारंवार प्रतीक्षेत राहिल्यानंतर आता पद्मश्री सन्मानाने माझी सर्व नाराजी दूर झाल्याची प्रतिक्रिया  महिला हॉकी संघाची दिग्गज गोलकीपर सविता पुनिया हिने व्यक्त केली.

३०० हून अधिक सामने खेळण्याचा मान मिळवणाऱ्या सविताने या सन्मानामुळे कुटुंबीय आनंदी झाल्याचे सांगितले. ती म्हणाली, ‘कुटुंबीयांनी माझे यश आणि माझा संघर्ष पाहिला आहे. मला सन्मान मिळताना पाहणे, हीच त्यांची इच्छा होती. पद्मश्री सन्मानामुळे माझा प्रवास आठवला. या काळात अनेक चढउतार आले.’ २००३ ला सातवीत असताना गावातील शासकीय शाळेच्या शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार वडिलांसोबत मी सिरसा येथे हाॅकी चाचणी दिली. आजारी आई अंथरुणाला खिळलेली होती. मी स्वयंपाक करायचे तर वडील नोकरीसोबतच घरकाम करायचे. अशा परिस्थितीत मी हॉकी खेळत असे. आजही तो काळ आठवला की आई-वडिलांचे बलिदान आठवते. 

Web Title : पद्मश्री ने हॉकी स्टार सविता पुनिया की नौकरी की दस साल की प्रतीक्षा कम की।

Web Summary : हॉकी में सफलता के बावजूद, सविता पुनिया को दस साल तक बेरोजगारी का सामना करना पड़ा। खेल रत्न पुरस्कार चूकने से निराश, पद्म श्री सम्मान ने अब उन्हें संतुष्ट किया, जिससे उन्हें परिवार के बलिदानों और उनकी चुनौतीपूर्ण यात्रा की याद आई।

Web Title : Padma Shri eases hockey star Savita Punia's decade-long job wait.

Web Summary : Despite hockey success, Savita Punia faced unemployment for ten years. Disappointed by missed Khel Ratna awards, the Padma Shri honor now fulfills her, reminding her of family sacrifices and her challenging journey.