राष्ट्रीय सबज्युनियर हॉकी स्पर्धेच्या महाराष्ट्र संघात तेजस चव्हाणची निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 19:10 IST2018-01-18T19:07:49+5:302018-01-18T19:10:30+5:30

उत्तर प्रदेश येथे सुरू असलेल्या 16 वर्षांखालील सब ज्युनिअर राष्ट्रीय हॉकी स्पर्धेच्या महाराष्ट्र  संघात तेजस मंगेश चव्हाण याचा समावेश झाला आहे.

Tejas Chavan's selection in Maharashtra team of National Sub-Junior Hockey Tournament | राष्ट्रीय सबज्युनियर हॉकी स्पर्धेच्या महाराष्ट्र संघात तेजस चव्हाणची निवड

राष्ट्रीय सबज्युनियर हॉकी स्पर्धेच्या महाराष्ट्र संघात तेजस चव्हाणची निवड

वैभववाडी: उत्तर प्रदेश येथे सुरू असलेल्या 16 वर्षांखालील सब ज्युनिअर राष्ट्रीय हॉकी स्पर्धेच्या महाराष्ट्र  संघात तेजस मंगेश चव्हाण याचा समावेश झाला आहे. तेजस हा तालुक्यातील खांबाळे गावचा सुपुत्र असून तो वाघबीळ, पन्हाळा (कोल्हापूर) येथील एकलव्य पब्लिक स्कूलमध्ये शिकत आहे.

पुणे बालेवाडी येथे निवड चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये सब ज्युनियर राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याच्या संघात तेजसची निवड झाली असून, उत्तर प्रदेशातील विटावा येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तो राज्याचे प्रतिनिधित्व करीत आहे. 

तेजस सद्या वाघबीळ येथील पब्लिक स्कूलमध्ये शिकत असून आधीचे प्राथमिक शिक्षण सोनाळीतील अभिनव विद्यामंदिर, फोंडाघाट येथील ग्रीन व्हॅली व सेंट उर्सुला येथे झाले आहे. त्याला क्रीडा प्रशिक्षक समीर भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. या निवडीबद्दल तेजसचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

Web Title: Tejas Chavan's selection in Maharashtra team of National Sub-Junior Hockey Tournament