शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी संघाला चक्क भांडी घासावी लागली; ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील दुरवस्थेवर हॉकी कर्णधार शकील अहमद बटचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 13:34 IST

Pakistan Exposed: ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पाकिस्तान हॉकी संघाचे प्रचंड हाल. १३ तास विमानतळावर ताटकळले, स्वतःची भांडी स्वतः घासली. कर्णधार शकील अहमद बटचा खळबळजनक खुलासा.

एकेकाळी जागतिक हॉकीवर राज्य करणाऱ्या पाकिस्तानहॉकी संघाची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान हॉकी संघाला तेथे जे हाल सहन करावे लागले, त्यावरून कर्णधार शकील अहमद बट याने पाकिस्तान हॉकी फेडरेशनवर जोरदार हल्ला चढवला आहे. "आम्हाला स्वतःची भांडी स्वतः घासावी लागली आणि १३ तास विमानतळावर ताटकळत राहावे लागले," असा खळबळजनक खुलासा कर्णधाराने केला आहे.'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. या दौऱ्यात खेळाडूंना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सिडनी विमानतळावर पोहोचल्यावर संघाला नेण्यासाठी कोणीही नव्हते. समन्वय नसल्यामुळे खेळाडूंना तब्बल १३ तास तिथेच थांबावे लागले. राहण्याची सोय असलेल्या ठिकाणी खेळाडूंना स्वतःची भांडी स्वतःच घासावी लागली, असे बटने सांगितले. एका आंतरराष्ट्रीय संघासाठी ही अत्यंत लाजीरवाणी बाब मानली जात आहे.

१० दिवसांचे बुकिंग, १३ दिवसांचा दौराफेडरेशनने केवळ १० दिवसांसाठी 'Airbnb' बुकिंग केले होते, तर दौरा १३ दिवसांचा होता. शेवटच्या ३ दिवसांत खेळाडूंना स्वस्त आणि गैरसोयीच्या ठिकाणी राहावे लागले.

कोट्यवधींच्या निधीचे काय झाले?या वादात आता पाकिस्तान स्पोर्ट्स बोर्डाने उडी घेतली असून त्यांनी स्पष्ट केले की, हॉटेलच्या व्यवस्थेसाठी फेडरेशनला १ कोटी पाकिस्तानी रुपये (१० मिलियन) देण्यात आले होते. मग हा पैसा गेला कुठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पंतप्रधानांकडून चौकशीचे आदेशपाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. कर्णधार बट याने असाही आरोप केला की, खेळाडूंना प्रसारमाध्यमांशी बोलण्यापासून रोखण्यात आले होते आणि कारवाईची धमकी देण्यात आली होती.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानHockeyहॉकीAustraliaआॅस्ट्रेलिया