ज्युनियर हॉकी विश्वचषक स्पर्धा : बेल्जियमला १-० असा धक्का देत भारतीय संघ उपांत्य फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 07:55 AM2021-12-02T07:55:42+5:302021-12-02T07:56:11+5:30

Junior Hockey World Cup: विद्यमान विश्वविजेत्या भारतीय संघाने शानदार खेळ करत बलाढ्य बेल्जियमचे आव्हान १-० असे परतावून ज्यूनिअर विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. यासह भारताने आपले विश्वविजेतेपद कायम राखण्याच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे.

Junior Hockey World Cup: India beat Belgium 1-0 in semifinals | ज्युनियर हॉकी विश्वचषक स्पर्धा : बेल्जियमला १-० असा धक्का देत भारतीय संघ उपांत्य फेरीत

ज्युनियर हॉकी विश्वचषक स्पर्धा : बेल्जियमला १-० असा धक्का देत भारतीय संघ उपांत्य फेरीत

Next

भुवनेश्वर : विद्यमान विश्वविजेत्या भारतीय संघाने शानदार खेळ करत बलाढ्य बेल्जियमचे आव्हान १-० असे परतावून ज्यूनिअर विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. यासह भारताने आपले विश्वविजेतेपद कायम राखण्याच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे.
श्रद्धानंद तिवारीने २१व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर केलेला गोल निर्णायक ठरला. या जोरावर मिळवलेली आघाडी अखेरपर्यंत कायम राखत भारताने बेल्जियमला स्पर्धेबाहेर केले. भक्कम बचावाच्या जोरावर भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिलेल्या विष्णुकांत सिंग सर्वोत्तम खेळाडू ठरला. दोन्ही संघांनी बचावात्मक खेळाचे शानदार प्रदर्शन केले. याआधी २०१६ साली भारताने बेल्जियमलाच अंतिम फेरीत २-१ असे नमवत विश्वविजेतेपद उंचावले होते.
सहा वेळेच्या चॅम्पियन जर्मनीने शूटआऊटमध्ये स्पेनचा ३-१ असा पराभव करीत उपांत्य फेरी गाठली. निर्धारीत वेळेत सामना २-२ असा बरोबरीत सुटलेला. अर्जेंटिनाने उपांत्य फेरी गाठत नेदरलँड्सला २-१ असे नमवले. फ्रान्सने मलेशियाचा ४-० असा धुव्वा उडवून दिमाखात उपांत्य फेरी गाठली.

Web Title: Junior Hockey World Cup: India beat Belgium 1-0 in semifinals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.