Indian hockey team's third consecutive win | भारतीय हॉकी संघाचा सलग तिसरा विजय

भारतीय हॉकी संघाचा सलग तिसरा विजय

एंटवर्प (बेल्जियम) : ड्रॅग फ्लिकर हरमनप्रीत सिंगच्या दोन गोलच्या जोरावर भारतीय पुरुष हॉकी संघाने सलग तिसरा विजय मिळवताना स्पेनचा ५-१ असा धुव्वा उडवला.
हरमनप्रीतने ४१व्या आणि ५१व्या मिनिटाला गोल केला. याशिवाय आकाशदीप सिंग (पाचवे मिनिट), एस. व्ही. सुनील (२०) व रमनदीप सिंग (३५) यांनीही प्रत्येकी एक गोल करत भारताच्या विजयात योगदान दिले. सुरुवातीलाच पिछाडीवर पडल्यानंतर भारतीयांनी जबरदस्त पुनरागमन केले. तिसऱ्याच मिनिटाला इग्लेसियास अल्वारोने शानदार गोल करत स्पेनला १-० असे आघाडीवर नेले. मात्र यानंतर भारतीयांनी स्पेनला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही.

Web Title:  Indian hockey team's third consecutive win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.