भारताकडून पाकिस्तानचा सफाया, गटात अव्वल स्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 14:16 IST2018-10-21T14:15:46+5:302018-10-21T14:16:10+5:30

भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धींमध्ये रंगणारी प्रत्येक लढत ही रोमहर्षक असते..

india beat pakistan at asian championship hockey | भारताकडून पाकिस्तानचा सफाया, गटात अव्वल स्थान

भारताकडून पाकिस्तानचा सफाया, गटात अव्वल स्थान

ओमान : भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धींमध्ये रंगणारी प्रत्येक लढत ही रोमहर्षक असते.. मग ती लढत क्रिकेटच्या मैदानावर असो किंवा हॉकी टर्फवर... शनिवारी रात्री अशाच एका थरारक सामन्यात भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई अजिंक्यपद चषक स्पर्धेत पाकिस्तानचा 3-1 असा सफाया केला. भारताने या स्पर्धेत सलग दोन विजयांची नोंद करताना गटात अव्वल स्थान कायम राखले आहे.



पाकिस्तानने पहिल्याच मिनिटाला इरफान ज्युनियरच्या गोलच्या जोरावर 1-0 अशी आघाडी घेतली. मात्र, त्यांना भारतीय खेळाडूंच्या आक्रमकतेचा अंदाज बांधता आला नाही. भारताने अवघ्या 41 मिनिटांत तीन गोल करत 3-1 अशी आघाडी घेतली. मनप्रीत (24 मि. ), मनदीप ( 33 मि.) व दिलप्रीत ( 42 मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला. 
2010 ते आत्तापर्यंत भारताने 19 वेळा पाकिस्तानला नमवले आहे. भारताने या कालावधीत 102 गोल्सचा पाऊस पाडला आहे. याउलट पाकिस्तानला केवळ 8 विजय मिळवता आले आणि त्यांनी 62 गोल्सही केले. 

Web Title: india beat pakistan at asian championship hockey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.