शहरं
Join us  
Trending Stories
1
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
2
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
3
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
4
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
5
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
6
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
7
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
8
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
9
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
10
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
11
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
12
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
13
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
14
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
15
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
16
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
17
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
18
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
19
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
20
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
Daily Top 2Weekly Top 5

Hockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 20:47 IST

भुवनेश्वर, पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा : ऑस्ट्रेलियाकडून 2014 मध्ये जेतेपदाच्या लढतीत घरच्या प्रेक्षकांसमोर झालेला पराभव नेदरलँड्सच्या चांगलाच जिव्हारी लागलेला. ...

भुवनेश्वर, पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा : ऑस्ट्रेलियाकडून 2014 मध्ये जेतेपदाच्या लढतीत घरच्या प्रेक्षकांसमोर झालेला पराभव नेदरलँड्सच्या चांगलाच जिव्हारी लागलेला. आज त्याची सव्याज परतफेड त्यांनी केली. भुवनेश्वर येथे सुरू असलेल्या पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत नेदरलँड्सने 4-3 (2-2) अशा फरकाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. जेतेपदाच्या लढतीत त्यांना बेल्जियमचा सामना करावा लागेल. नेदरलँड्सने सडन डेथमध्ये गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. 

सुरेख पासिंग, योग्य ताळमेळचा खेळ करताना नेदरलँड्सने चेंडू आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवले. नेदरलँड्सच्या खेळाडूकडून चेंडू हिसकावण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या तीन- तीन खेळाडूंना संघर्ष करावा लागला. 9 व्या मिनिटाला ग्लेन स्कुर्मन आणि 20 व्या मिनिटाला सेव व्हॅन ॲसने गोल करताना पहिल्या सत्रात नेदरलँड्सला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. 

तिसऱ्या सत्रात टीम हॉवर्डने गोल करून ऑस्ट्रेलियाची पिछाडी 1-2 अशी कमी केली. चौथ्या सत्रातील अखेरच्या सहा मिनिटांत नेदरलँड्सने खेळ उंचावला. तीन मिनिटे शिल्लक असताना ऑस्ट्रेलियाला मिळालेल्या कॉर्नरवर नेदरलँड्सच्या  गोलरक्षकाने अप्रतिम बचाव केला. पण अखेरच्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाने बरोबरीचा गोल करण्यात  यश मिळवले. एडी ओकेंडेनने सर्कलवरून मारलेला चेंडू नेदरलँड्सच्या खेळाडूला लागून गोलजाळीत गेला आणि ऑस्ट्रेलियाने अखेरच्या क्षणाला 2-2 अशी बरोबरी साधली. त्यामुळे सामना पेनल्टी शूटआउटमध्ये गेला. 

शूटआउटमध्ये पहिल्या पाच प्रयत्नांत दोन्ही संघाचे प्रत्येकी दोन प्रयत्न अपयशी ठरले. 3-3 अशा बरोबरीमुळे सामना सडनडेथमध्ये गेला. त्यात नेदरलँड्सच्या गोलीने आपली कामगिरी चोख बजावली आणि नेदरलँड्सने 4-3 (2-2) अशा विजयासह अंतिम फेरीत प्रवेश केला.