हॉकी : भारताच्या संघात माजी कर्णधार सरदार सिंगला संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2018 19:30 IST2018-05-31T19:30:06+5:302018-05-31T19:30:06+5:30
नेदरलँड्समध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेसाठी भारताचा माजी कर्णधार सरदार सिंग आणि मध्यरक्षक बिरेंदर लाक्रा यांना संधी देण्यात आली आहे.

हॉकी : भारताच्या संघात माजी कर्णधार सरदार सिंगला संधी
नवी दिल्ली : नेदरलँड्समध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात भारताचा माजी कर्णधार सरदार सिंग आणि मध्यरक्षक बिरेंदर लाक्रा यांना संधी देण्यात आली आहे. या स्पर्धेला 23 जून रोजी सुरुवात होणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेसाठी 18 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा आज करण्यात आली. भारतीय संघाचे कर्णधारपद गोलरक्षक पी आर. श्रीजेशकडे सोपवण्यात आले आहे.
भारतीय संघ पुढीलप्रमाणे
गोलरक्षक : पी. आर. श्रीजेश (कर्णधार), कृष्णा बहादूर पाठक.
बचावपटू : हरमनप्रीत सिंग, वरुण कुमार, सुरेंदर कुमार, जरमनप्रीत सिंग, बिरेंदर लाक्रा, अमित रोहिदास.
मध्यरक्षक : मनप्रीत सिंग, चिंग्लेसाना सिंग कांगुजाम, सरदार सिंग, विवेक सागर प्रसाद.
आक्रमणपटू : सुनील विठलाचार्य, रमणदीप सिंग, मनदीप सिंग, सुमित कुमार, अक्षदीप सिंग, दिलप्रीत सिंग.