शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

गोलकीपर श्रीजेशचे पुनरागमन, हॉकी इंडियाकडून राष्ट्रीय शिबिरासाठी ३३ खेळाडूंची नावे जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 1:00 AM

हॉकी इंडियाने आज गुरुवारपासून सुरू होत असलेल्या वर्षातील पहिल्या राष्ट्रीय शिबिरासाठी ३३ खेळाडूंची यादी जाहीर केली असून, त्यात अनुभवी गोलकीपर पी. आर. श्रीजेश याचा समावेश करण्यात आला. गुडघ्याच्या दुखापतीमुळे आठ महिने बाहेर राहिलेल्या श्रीजेशपुढे फॉर्ममध्ये येण्याचे आव्हान असेल.

बंगळुरू  - हॉकी इंडियाने आज गुरुवारपासून सुरू होत असलेल्या वर्षातील पहिल्या राष्ट्रीय शिबिरासाठी ३३ खेळाडूंची यादी जाहीर केली असून, त्यात अनुभवी गोलकीपर पी. आर. श्रीजेश याचा समावेश करण्यात आला. गुडघ्याच्या दुखापतीमुळे आठ महिने बाहेर राहिलेल्या श्रीजेशपुढे फॉर्ममध्ये येण्याचे आव्हान असेल. मागच्या वर्षी अझलान शाह हॉकी स्पर्धेदरम्यान तो जखमी झाला होता.ओडिशा येथे झालेल्या विश्व हॉकी लीगमध्ये कांस्य जिंकून वर्षाला निरोप देणाºया भारतीय संघाचे नव्या वर्षात पहिले १० दिवसांचे शिबिर साई केंद्रात सुरू होत आहे. शिबिरासाठी २०१६ चा ज्युनियर विश्वचषक विजेत्या संघाचा गोलकीपर कृष्णा पाठक याला आकाश चिकटे आणि सूरज करकेरा यांच्यासोबत संधी देण्यात आली. सूरजने विश्व लीगदरम्यान प्रभावित केले होते. आशिया चषक विजेतेपदात प्रभावी कामगिरी करणारा ओडिशाच्या सुंदरगड येथील युवा खेळाडू नीलम संजीव यालादेखील स्थान देण्यात आले.सरदारसिंग, हरमनप्रीत, अमित रोहिदास, दीप्सन तिर्की, वरुण कुमार, रूपिंदरपालसिंग, वीरेंद्र लाक्रा, सुरेंदर कुमार आणि गुरिंदरसिंग यांना बचाव फळीसाठी निवडण्यात आले. मधल्या फळीत खेळणाºयांच्या यादीतबदल झालेले नाहीत. मनप्रीतसिंग, चिंगलेनसना सिंग, एस. के. उथप्पा, कोथाजितसिंग, सतबीरसिंग, नीलकांत शर्मा, सिमरनजितसिंग आणि हरजितूसिंग यांचे स्थान कायम आहे.फॉरवर्ड सुमित कुमार याच्यासह एस. व्ही. सुनील, आकाशदीपसिंग, मनदीप सिंग, ललित उपाध्याय, गुरजंत सिंग, रमणदीप सिंग, अरमान कुरेशी, अफ्फान युसूफ आणि तलविंदरसिंग हे आघाडीच्या फळीत आहेत.यंदा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन गोल्ड कोस्ट येथील चॅम्पियन्स ट्रॉफी नेदरलँड येथे, आशियाड जकार्ता येथे आणि आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी भुवनेश्वर येथे होणार आहे.मुख्य कोच मारिन शोर्ड म्हणाले, ‘न्यूझीलंडमध्ये आठ सामने खेळायचे आहेत. त्यादृष्टीने लहान शिबिराची आखणी करण्यात आली आहे. स्थानिक सामने खेळणाºया खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.’शिबिरासाठी निवडले गेलेले खेळाडूगोलकीपर : आकाश चिकटे, सूरज करकेरा, पीआर श्रीजेश आणि कृष्ण बी पाठक.बचाव फळी : सरदारसिंग, हरमनप्रीतसिंग, अमित रोहिदास, दीप्सन तिर्की, वरुण कुमार, रूपिंदरपालसिंग, वीरेंद्र लाक्रा, सुरेंदर कुमार, गुरिंदरसिंग आणि नीलम संजीव.मिडफिल्डर : मनप्रीतसिंग, चिंंगलेनसना सिंग, एस. के. उथप्पा, सुमित, कोथाजितसिंग, सतबीरसिंग, नीलकांत शर्मा, सिमरनजितसिंग आणि हरजितसिंग.फॉरवर्ड : सुमित कुमार, एस. व्ही. सुनील, आकाशदीपसिंग, मनदीपसिंग, ललित उपाध्याय, गुरजंतसिंग, रमणदीपसिंग, अरमान कुरेशी, अफ्फान युसूफ आणि तलविंदरसिंग.

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारत