शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

चौरंगी हॉकी मालिका : भारताची यजमान न्यूझीलंडवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:29 IST

भारतीय पुरुष हॉकी संघाने बुधवारी चार देशांच्या हॉकी स्पर्धेत यजमान न्यूझीलंडला बुधवारी संघर्षपूर्ण लढतीत ३-२ ने नमविले. ललित उपाध्याय, हरजितसिंग आणि रुपिंदरपालसिंग यांनी गोल नोंदविले. डॅनियल हॅरिस आणि केन रसेल यांनी प्रतिस्पर्धी संघाकडून गोल केले. न्यूझीलंडचे खेळाडू सुरुवातीपासून आक्रमक होते. त्यांनी ‘डी’मध्ये प्रवेश करण्याचा वारंवार प्रयत्न केला; पण भारतीय बचावफळीने त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरविले.

हॅमिल्टन : भारतीय पुरुष हॉकी संघाने बुधवारी चार देशांच्या हॉकी स्पर्धेत यजमान न्यूझीलंडला बुधवारी संघर्षपूर्ण लढतीत ३-२ ने नमविले. ललित उपाध्याय, हरजितसिंग आणि रुपिंदरपालसिंग यांनी गोल नोंदविले. डॅनियल हॅरिस आणि केन रसेल यांनी प्रतिस्पर्धी संघाकडून गोल केले. न्यूझीलंडचे खेळाडू सुरुवातीपासून आक्रमक होते. त्यांनी ‘डी’मध्ये प्रवेश करण्याचा वारंवार प्रयत्न केला; पण भारतीय बचावफळीने त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरविले.दौºयात पहिल्या टप्प्यात भारतीय संघाने चांगली कामगिरी केली. जपान आणि न्यूझीलंडला पराभवाचे धक्के दिले; मात्र बेल्जियमविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. सातव्या मिनिटाला ललित उपाध्यायने चेंडू गोलपोस्टमध्ये ढकलत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. दुसºया सत्राच्या सुरुवातीला न्यूझीलंडला पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याच्या दोन संधी मिळाल्या, मात्र भारतीय गोलरक्षक पी. आर .श्रीजेशने त्यांचे मनसुबे पुन्हा उधळून लावले.अखेर २३व्या मिनिटाला न्यूझीलंडने पहिल्यांदा गोलचे खाते उघडले. डॅनियल हॅरिसने सुरेखमैदानी गोल करीत १-१ अशी बरोबरी साधली. मध्यंतरानंतर ३१व्या मिनिटाला हरजितसिंगने पेनल्टी कॉर्नवर गोल करीत २-१ अशी आघाडी मिळवून दिली. ३६ व्या मिनिटाला रुपिंदरपालसिंग याने पेनल्टी कॉर्नरवर गोल करताच आघाडी ३-१ अशी झाली. ३७व्या मिनिटाला न्यूझीलंडकडून केन रसेलने पुन्हा एकदा मैदानी गोल केला. न्यूझीलंडने सामन्यात अनेकदा पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय बचावपटूंच्या भक्कम बचावापुढे त्यांना अपयश आले. अखेर सामना संपताना भारताने ३-२ या फरकाने सामन्यात बाजी मारली. भारताला दुसºया सामन्यात बेल्जियमविरुद्ध खेळावे लागेल. (वृत्तसंस्था)

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारतNew Zealandन्यूझीलंड