शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

FIH Women's Hockey World Cup : भारतीय संघाची कसोटी, सलामीलाच इंग्लंडचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 4:57 PM

आठ वर्षांनंतर पुनरागमन करणा-या आणि टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या पात्रतेचे लक्ष्य खुणावत असलेल्या भारतीय संघाची महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेच कसोटी लागणार आहे.

ठळक मुद्दे भारतीय संघातील 18 पैकी 16 खेळाडू प्रथमच विश्वचषक स्पर्धेत खेळणार आहेत.

लंडन - आठ वर्षांनंतर पुनरागमन करणा-या आणि टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या पात्रतेचे लक्ष्य खुणावत असलेल्या भारतीय संघाची महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेच कसोटी लागणार आहे. 2017च्या आशिया चषक विजेत्या भारतीय संघाला सलामीच्याच सामन्यात यजमान इंग्लंडचा सामना करावा लागणार आहे. जागतिक क्रमावारीत इंग्लंड दुस-या, तर भारत दहाव्या स्थानावर आहे.  शनिवारपासून सुरू होत असलेल्या या स्पर्धेत भारताचे नेतृत्व संघातील अनुभवी खेळाडू राणी रामपाल करणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या स्पेन दौ-यात भारतीय संघाने चांगली कामगिरी केली आहे आणि त्यांच्याकडून विश्वचषक स्पर्धेत अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. भारताला ब गटात इंग्लंडव्यतिरिक्त अमेरिका आणि आयर्लंड यांचा सामना करावा लागणार आहे. स्पर्धेचे फॉरमॅशन : चार गटातील अव्वल चार संघांना थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळणार आहे, तर उर्वरीत चार जागांसाठी प्रत्येक गटातील दुस-या व तिस-या स्थानावरील संघ एकमेकांशी भिडणार आहेत. अन्य संघ : अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, चीन, जर्मनी, इटली, जपान, कोरिया, नेदरलँड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि स्पेन. सर्वोत्तम कामगिरी : 1974च्या पहिल्याच स्पर्धेत पटकावलेले चौथे स्थान ही भारताची सर्वोत्तम कामगिरी आहे. कांस्यपदकाच्या लढतीत पश्चिम जर्मनीने 2-0 अशा फरकाने भारताला पराभूत केली होती.संघाबद्दल इंटरेस्टींग : भारतीय संघातील 18 पैकी 16 खेळाडू प्रथमच विश्वचषक स्पर्धेत खेळणार आहेत. कर्णधार राणी आणि दीपिका हे या दोन वरिष्ठ खेळाडूंनी 2010ची विश्वचषक स्पर्धा खेळली होती. भारतीय संघाचे वेळापत्रक21 जुलै - भारत वि. इंग्लंड, सायं. 6.30 वा.26 जुलै - भारत वि. आयर्लंड, सायं. 6.30 वा.29 जुलै - भारत वि. अमेरिका, रात्री 9.30 वा.

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारतSportsक्रीडा