शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

इंग्लंडने न्यूझीलंडला २-० असे नमवून गाठली उपांत्यपूर्व फेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 4:45 AM

इंग्लंडने सांघिक खेळाच्या जोरावर न्यूझीलंडचा २-० असा पराभव करत पहिल्या क्रॉसओव्हर सामन्यात वर्चस्व राखले.

भुवनेश्वर : इंग्लंडने सांघिक खेळाच्या जोरावर न्यूझीलंडचा २-० असा पराभव करत पहिल्या क्रॉसओव्हर सामन्यात वर्चस्व राखले. यासह इंग्लंडने विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली असून आता त्यांचापुढे आॅलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिनाचे तगडे आव्हान असेल.इंग्लंडकडून व्हिल कलनान (२५वे मिनिट) याने मैदानी गोल केला. तसेच, ४४व्या मिनिटाला ल्यूक टेलर याने पेनल्टी कॉर्नरवर जबरदस्त गोल करत संघाला भक्कम आघाडी मिळवून दिली. या विजयासह आत्मविश्वास उंचावलेला इंग्लंड संघ बुधवारी होणाऱ्या पहिल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बलाढ्य अर्जेंटिनाच्या आव्हानाला सामोरे जाईल.जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या इंग्लंडने एकहाती वर्चस्व राखताना न्यूझीलंडला पूर्णपणे दबाव टाकले. पहिल्या दोन क्वार्टरमध्ये आक्रमक हल्ले केलेल्या इंग्लंडविरुद्ध तिसºया क्वार्टरमध्ये न्यूझीलंडने जोरदार खेळ केला. पण, शेवटपर्यंत त्यांना इंग्रजांचा बचाव भेदण्यात यश आले नाही. यासह इंग्लंडने स्पर्धा इतिहासात अव्वल आठ संघात स्थान मिळवण्याची परंपराही कायम ठेवली.दुसरीकडे झालेल्या अन्य लढतीत फ्रान्सने दुसºया क्रॉसओव्हर सामन्यात बाजी मारत चीनचे कडवे आव्हान १-० असे परतावले. यासह उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलेल्या फ्रान्सला पुढील सामन्यात बलाढ्य आॅस्टेÑलियाविरुद्ध भिडावे लागेल. सामन्यातील एकमेव गोल ३६व्या मिनिटाला टिमोथी क्लेमेंटने केला.स्पर्धेत सहभागी देशांपैकी फ्रान्सचे जागतिक स्थान सर्वात कमी २०वे आहे. मात्र त्यांनी साखळी सामन्यात आॅलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिनाला ५-३ असा धक्का देत सर्वांना चकीत केले होते. यानंतर त्यांनी जागतिक क्रमवारीत १७व्या स्थानावरील चीनला नमवून दिमाखात आगेकूच केली आहे. चीनला त्यांचा संथ खेळ महागात पडला. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Hockey World Cup 2018हॉकी विश्वचषक स्पर्धाEnglandइंग्लंडNew Zealandन्यूझीलंड