शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

प्रशिक्षक हरेंद्र यांनी पराभवाचे खापर फोडले पंचांवर; खराब अंपायरिंगमुळे रहावे लागले पदकापासून दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 06:59 IST

‘सलग दुसऱ्या स्पर्धेत खराब अंपायरिंगमुळे भारताला पदकापासून वंचित रहावे लागले,’ असे ते म्हणाले.

भुवनेश्वर : भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांनी विश्व चषकातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात नेदरलँड्सने भारताचा केलेल्या पराभवाचे खापर पंचावर फोडले आहे. ‘सलग दुसऱ्या स्पर्धेत खराब अंपायरिंगमुळे भारताला पदकापासून वंचित रहावे लागले,’ असे ते म्हणाले.नेदरलॅँड्सने भारताचा १-२ असा पराभव केला. त्यानंतर हरेंद्र सिंग यांनी सांगितले की,‘मला समजत नाही की अमित रोहिदास याला दहाव्या मिनिटाला पिवळे कार्ड का दाखवण्यात आले? मनप्रीत याला मागून धक्का मारण्यात आल्यानंतरही डच खेळाडूला कोणतेही कार्ड मिळाले नाही. आम्ही आशियाई स्पर्धेनंतर विश्वचषकात जिंकण्याची संधी खराब अंपायरिंगमुळे गमावली.’हरेंद्र सिंग पुढे म्हणाले की, ‘मी या पराभवासाठी माफी मागतो. मात्र जोपर्यंत पंचांच्या कामगिरीचा स्तर उंचावत नाही तोपर्यंत याच प्रकारच्या परिणामांचा समाना करावा लागेल.’ कर्णधार मनप्रीत सिंह म्हणाला, ‘दोन मोठ्या स्पर्धेत आमच्यासोबत असा प्रकार झाला. लोक आम्हाला विचारतात की विजय का मिळत नाही? आम्ही त्यांना काय उत्तर द्यावे.’हरेंद्र यांनी तक्रार दाखल करण्यास नकार दिला आहे. ते म्हणाले की, ‘माझ्या कारकिर्दीत मी विरोध केल्यानंतर कोणतेही परिणाम चांगले आले नाही. आम्ही हा निकाल स्वीकार करतो. मात्र तटस्थ अंपायरिंगची मागणी करत आहोत. पंचाचा एक चुकीचा निर्णय संघाच्या चार-पाच वर्षांच्या मेहनतीवर पाणी फिरवतो.’ ते पुढे म्हणाले की, ‘खेळाडूंनी बरोबरीची लढत दिली. मी त्यांना त्यांच्या कामगिरीचे श्रेय देतो. दोन्ही संघांनी खूपच आक्रमक हॉकी खेळली.’पंचांवरील टीका चुकीची - डच प्रशिक्षकडच प्रशिक्षक मॅक्स कॅलडेस यांनी पंचांच्या कामगिरीवरील टीका चुकीची असल्याचे सांगितले,‘पंचांनी सामना नाही खेळला. आम्ही खेळलो व जिंकलो. पराभवानंतर या प्रकारची चर्चा होते. मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीत पंचांचा निर्णय आमच्या विरोधात गेला होता. तेव्हा आम्ही भारतासोबत ड्रॉ खेळलो होतो. पंच आपले काम करतात आणि खेळाडू आपले काम करतात.’ डच कर्णधार बिली बाकेर म्हणाला की, ‘आम्हाला पंचांविरोधात कोणतीही तक्रार नाही.’

टॅग्स :Hockey World Cup 2018हॉकी विश्वचषक स्पर्धाIndiaभारत