शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

थरारक विजयासह बेल्जियम विश्वविजेते

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2018 22:40 IST

पुरुष हॉकी विश्वचषक : सडनडेथवर नेदरलॅँडचा  ३-२ ने पराभव

भुवनेश्वर : सडनडेथपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात बेल्जियमने नेदरलॅँडचा ३-२ गोलने पराभव करत हॉकीचे विश्वविजेतेपद पटकावले. येथील कलिंगा स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात निर्धारित वेळेत कोणत्याही संघाला गोल करत आला नाही. पेनल्टी शूटआऊटवर हा सामना पुन्हा २-२ असा बरोबरीत राहिला. बेल्जियमने सडनडेथवर गोल करत प्रथमच जेतेपद पटकावले.

स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरीत पोहचलेल्या बेल्जियमने  अंतिम सामन्यात बलाढ्य नेदरलॅँडला गोल करण्यापासून रोखले. आॅस्ट्रेलियाला पराभूत करत अंतिम फेरीत दाखल झालेल्या नेदरलॅँडला कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही.दोन्ही संघांनी गोल करण्याच्या अनेक संधी गमावल्या.

निर्धारित वेळेत सामना गोलशून्य बरोबरीत सुटल्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये बेल्जियमकडून वॉन ओबेल फ्लोरेंट व वेगनेज व्हिक्टर यांनी गोल केले तर त्यांच्या वॉन आॅर्थर, डेनायेर फेलिक्स व डे स्लूवेर यांना गोल करण्यात अपयश आले. नेदरलॅँडकडून जेरॉन हर्ट्सबर्गर व जियुस जोन्स यांनी गोल केले. मिरको प्रुजर, वॉन सीव व वॉन थिस यांना गोल करता आला नाही. सामना सडनडेथवर गेल्यानंतर बेल्जियमच्या वॉन ओबेल याने गोल केला तर नेदरलंडच्या हर्ट्सबर्गरला गोल नोंदवता आला नाही.

पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहचलेल्या बेल्जियमने विश्वविजेतेपद पटकावले. मागील विश्वचषक स्पर्धेत बेल्जियम पाचव्या स्थानी राहिले होते. जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या नेदरलॅँडला मागील विश्वचषक स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

टॅग्स :Hockey World Cup 2018हॉकी विश्वचषक स्पर्धा