Asian Games 2018: भारतीय हॉकी संघाचा 17-0 असा दमदार विजय
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 20:16 IST2018-08-20T20:11:29+5:302018-08-20T20:16:04+5:30
भारताकडून मनजीत सिंग, सिमरनजीत सिंग आणि दिलप्रीत सिंग यांनी प्रत्येकी तीन गोल करत विजयात मोलाची भूमिका बजावली.

Asian Games 2018: भारतीय हॉकी संघाचा 17-0 असा दमदार विजय
जकार्ता : भारताच्या पुरुष हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सोमवारी नेत्रदीपक कामगिरी केली. भारताने यजमान इंडोनेशियाला तब्बल 17-0 असा फरकाने पराभूत केले.
Just in: Men's Hockey | India start off their campaign with 17-0 (yes 17-0) thrashing of host Indonesia
— India@AsianGames2018 (@India_AllSports) August 20, 2018
To take on Hong Kong next on Wednesday #AsianGames2018
भारताने इंडोनेशियावर सुरुवातीपासूनच आक्रमण केले. भारताकडून मनजीत सिंग, सिमरनजीत सिंग आणि दिलप्रीत सिंग यांनी प्रत्येकी तीन गोल करत विजयात मोलाची भूमिका बजावली. रुपिंदरपाल सिंगने यावेळी दोन गोल केले. त्याचबरोबर अमित रोहिदास, विवेक सागर प्रसाद, सुनील, हरमनप्रीत, ललित कुमार, अक्षदीप यांनी प्रत्येकी एक गोल केला. यानंतर भारताचा पुढील सामना हाँगकाँगबरोबर होणार आहे.