भारताच्या स्टार हॉकीपटूवर एअरलाईन स्टाफ तरुणीकडून बलात्काराचा गुन्हा; अल्पवयीन असताना शरीरसंबंध
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 19:10 IST2024-02-06T19:10:09+5:302024-02-06T19:10:31+5:30
Varun Kumar Indian Hockey Player Rape Case: पीडित महिला ही १७ वर्षांची असताना वरुणच्या संपर्कात आली होती. ती सध्या एका एअरलाईन कंपनीत नोकरी करते आहे.

भारताच्या स्टार हॉकीपटूवर एअरलाईन स्टाफ तरुणीकडून बलात्काराचा गुन्हा; अल्पवयीन असताना शरीरसंबंध
भारताचा हॉकीपट्टू वरुण कुमार याच्यावर एका महिलेने लग्नाचे आमिष दाखवून अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. यामुळे वरुण कुमारवर पोलिसांनी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी याची माहिती देण्यात आली आहे.
पीडित महिला ही १७ वर्षांची असताना वरुणच्या संपर्कात आली होती. ती सध्या एका एअरलाईन कंपनीत नोकरी करते आहे. ती जेव्हा १७ वर्षांची होती, तेव्हा २०१८ मध्ये अर्जुन पुरस्कार विजेता वरुण कुमारच्या संपर्कात आली होती. तेव्हा वरुण बंगळुरूमध्ये SAI मध्ये प्रशिक्षण घेत होता, असे तिने एफआयरमध्ये म्हटले आहे.
वरुणने इन्स्टावरून तिच्याशी संपर्क साधला होता व भेटायचे असल्याचे सारखे म्हणत होता. जेव्ही या तरुणीने त्याला काहीच रिप्लाय दिला नाही तेव्हा त्याने त्याच्या मित्रांना या तरुणीला भेटण्यासाठी मनविण्यास सांगितले होते. जेव्हा ती भेटायला आली तेव्हा वरुनने त्याच्या मनात तिच्याबद्दल प्रेमभावना असल्याचे कबुल केले होते. यानंतर ते मित्र बनले व नंतर रिलेशनशिपमध्ये आले.
२०१९ मध्ये वरुणने तिला भविष्याबाबत बोलायचे आहे असे सांगून बंगळुरुच्या एका हॉटेलमध्ये बोलावले होते. तिथे तिच्याशी शरीर संबंध प्रस्थापित केले. जेव्हा त्या तरुणीने त्याला विरोध केला तेव्हा त्याने तुझ्याशी लग्न करणार असल्याचे सांगितले होते. पाच वर्षांच्या काळात हेच सांगत वरुणने तिच्याशी अनेकदा शरीर संबंद ठेवले. यानंतर तिला दूर करत तिचे फोन, मेसेजना रिप्लाय देणे बंद केले.
जेव्हा तिने त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकला तेव्हा त्याने तिला तिचे नग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला. पोलीसांकडील एफआयआरमध्ये तिने वरुणवर फसवणुकाचा आरोप केला आहे.