ज्युनिअर हॉकी राष्ट्रीय शिबिरासाठी ३४ खेळाडूंची निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 05:12 IST2018-11-10T05:12:01+5:302018-11-10T05:12:20+5:30
हॉकी इंडियाने बेंगळुरु येथे ११ नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या ज्युनिअर राष्टÑीय चाचणी शिबिरासाठी ३४ संभाव्य खेळाडूंंना निवडले असून त्यातील सहा खेळाडू वरिष्ठ हॉकी संघाचे सदस्य आहेत.

ज्युनिअर हॉकी राष्ट्रीय शिबिरासाठी ३४ खेळाडूंची निवड
नवी दिल्ली - हॉकी इंडियाने बेंगळुरु येथे ११ नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या ज्युनिअर राष्टÑीय चाचणी शिबिरासाठी ३४ संभाव्य खेळाडूंंना निवडले असून त्यातील सहा खेळाडू वरिष्ठ हॉकी संघाचे सदस्य आहेत.
या सहा वरिष्ठ संघातील खेळाडूंमध्ये सुमन बेक, मनदीप मोर, यशदीप सिवाच, विशाल अंतिल, गुरसाहिबजीत सिंग आणि शिलानंद लाक्रा या खेळाडूंचा समावेश आहे. हे सर्व खेळाडू भुवनेश्वर येथे सुरु असलेल्या शिबिरामध्ये वरिष्ठ संघासोबत सराव करीत आहेत. २३ नोव्हेंबर रोजी ते ज्युनिअर शिबिरात दाखल होतील. या यादीत अलीकडे सुल्तान जोहोर कप रौप्य विजेत्या संघातील काही खेळाडू देखील आहेत. (वृत्तसंस्था)
संभाव्य ज्युनिअर हॉकीपटू :
गोलकीपर : पंकज कुमार रजक, पवन, कमलबीरसिंग.
बचाव फळी : सुमन बेक, मोहम्मद फराज, संजय, सोमजीत, मनदीप मोर, परमप्रीतसिंग, दिनाचंद्रासिंग एम, प्रिन्स, वरिंदरसिंग, सिरिल लुगुन.
मधली फळी : अक्षय अवस्थी, सेस ग्रेगोरी, यशदीप सिवाच, हरमनजीतसिंग, विष्णु कांतसिंग, गोपी कुमार सोनकर, विशाल अंतिल, नीरज कुमार, रवींद्रसिंग, एम.हसप्रीतसिंग.
आक्रमक फळी : सुदीप चिरमाको, मणिंदरसिंग, गुरसाहिबजीतसिंग, अमनदीपसिंग, अभिलाष स्टॅलिन, एच. मणिसिंग, प्रभज्योतसिंग, शिवम आनंद, राहुल कुमार राजभर.