महिलेस जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 00:18 IST2018-11-13T00:18:18+5:302018-11-13T00:18:33+5:30
उसने दिलेले पैसे परत मागितल्याने एका महिलेस केसाला धरून खाली पाडले, तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना कळमनुरी तालुक्यातील लासिना येथे १२ नोव्हेंबर रोजी घडली.

महिलेस जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : उसने दिलेले पैसे परत मागितल्याने एका महिलेस केसाला धरून खाली पाडले, तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना कळमनुरी तालुक्यातील लासिना येथे १२ नोव्हेंबर रोजी घडली.
अनिता शिवाजी सुतारे यांनी पुर्वी दिलेले पैसे विष्णू सुभाष कुºहाडे यांना मागितले. पैसे परत मागितल्याने विष्णू कुºहाडे याने अनिता यांना घरात घुसून केसाला धरून खाली पाडले. व जातीवाचक शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी अनिता सुतारे यांच्या फिर्यादीवरून विष्णू कुºहाडेविरूद्ध कळमनुरी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे करीत आहेत.
संशयितास अटक
हिंगोली - शहरातील तापडिया इस्टेट परिसरात घरफोडी, चोरी करण्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या एका इसमास पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले. सदर इसम दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने आढळून आल्याने याप्रकरणी हिंगोली शहर ठाण्याचे पोशि उमेश जाधव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला.