शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
2
KL Rahul च्या नेतृत्वासमोर मुंबई इंडियन्स ढेपाळले; रोहित ४, तर हार्दिक गोल्डन डकवर आऊट 
3
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
4
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
5
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
6
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
7
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
8
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
9
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
10
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
11
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
12
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
13
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
14
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
15
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
16
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
17
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
18
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
19
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
20
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव

जिल्हा परिषदेत कोणाची होणार आघाडी; अजूनही अनिश्चितताच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 8:07 PM

जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीची सभा २ जानेवारी रोजी

ठळक मुद्देसदस्यांची मनधरणी सुरू आज महाविकासच्या बैठकीची शक्यता

हिंगोली : जिल्हा परिषदेची अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड आता दोन दिवसांवर आली असताना पूर्वीचाच फॉर्म्युला राहणार की नवीन काही बदल होणार यावरून चर्वितचर्वण सुरू आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीतील उपाध्यक्षपदाच्या इच्छुकांतील रस्सीखेचही कायम आहे. प्रत्येकजण मनधरणी करण्यात गुंतल्याचे दिसून येत आहे.  

जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीची सभा २ जानेवारी रोजी जि.प. सभागृहात होणार आहे. यावेळीही पूर्वीचाच फॉर्म्युला कायम राहिल्यास शिवसेनेकडे एकमेव सदस्य असलेल्या गणाजी बेले यांना अध्यक्षपदाची संधी मिळणार आहे. तर काही बदल झाल्यास काँग्रेसकडे दोन तर राष्ट्रवादीकडे एकजण यासाठी इच्छुक आहे. रामराव वाघडव, डॉ.सतीश पाचपुते यांची नावेही आधी चर्चेत होती. मात्र आपल्या पदांमध्ये काही बदल होणार नाही, हे गृहित धरून राष्ट्रवादीची मंडळी उपाध्यक्षपदाच्या शर्यतीत जोर लावताना दिसत आहे. मनीष आखरे, यशोदा दराडे, रत्नमाला चव्हाण, राजेश देशमुख, संजय कावरखे ही नावे चर्चेत आहेत. एकेक नाव कमी होत असून शेवटच्या टप्प्यापर्यंत लढा देणाऱ्यालाच संधीची चिन्हे आहेत. पक्षश्रेष्ठींचेही वजन कोणाच्या पारड्यात पडते, याला महत्त्व आहे.

सभापतीपदासाठी इच्छुक शांतसभापतीपदी निवडीसाठी १४ जानेवारी २0१९ पर्यंत वाट पहावी लागणार आहे. त्यामुळे या पदांसाठी इच्छुकांची अजून काहीच हालचाल दिसत नाही. विशेष म्हणजे अजून वाटाघाटींची बैठकच नसल्याने ही बैठक होईपर्यंत आपल्या पक्षाच्या पदरात नेमके काय पडणार आहे, हे कळणारही नाही. त्यामुळेही अनेक इच्छुकांनी तूर्त आपल्या महत्त्वाकांक्षांना आवर घातल्याचे दिसून येत आहे. मात्र १ जानेवारीला महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार असल्याची चर्चा रंगत आहे. ही बैठक झाल्यानंतरच यात नेमकी कोणती पदे कोणत्या पक्षाकडे राहतील, याचा मेळ लागणार आहे. त्यात शिवसेनेला अध्यक्षपद कायम ठेवून सभापतीपद बदलून पाहिजे आहे. त्यामुळे आता हे सभापतीपद नेमके कोणते राहील, याची काही श्वासती नाही. या पदावरूनही स्पर्धेतील मंडळी समोर येणार असल्याचे दिसते.

नेतेमंडळी बाहेर, सदस्यांतच चर्चांना ऊतज्यांच्या हाती पदासाठी नाव निश्चित करण्याची कमान पक्षाने दिली आहे, अशी नेतेमंडळी जिल्ह्याबाहेरच आहे. सदस्यांना येथून त्यांच्याशी भ्रमणध्वनीवरच संपर्क साधावा लागत आहे. विशेष म्हणजे वशिल्यासाठी येणाऱ्या फोनला ही मंडळीही वैतागली आहे.४यावेळी सदस्यसंख्येचा मुद्दा करून काँग्रेसला महिला व बालकल्याण सभापतीपद देत त्यांच्याकडील शिक्षण अथवा समाजकल्याण हे पद पदरात पाडून घेण्याचा सेनेचा प्रयत्न आहे. त्याला यश येते की नाही, हे उद्या कळणारच आहे.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदHingoliहिंगोलीNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना