शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

हिंगोलीत अर्ध्यावरच गुंडाळली पाणीटंचाई आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:51 IST

येथील न. प. कल्याण मंडपम्मध्ये ४ एप्रिल रोजी पंचायत समितीच्या वतीने आ. तान्हाजी मुटकुळे यांच्या अध्यक्षतेखाली तर आ. डॉ. संतोष टारफे यांच्या सहअध्यक्षतेखाली घेतलेल्या पाणीटंचाई आढावा बैठक झाली. त्यात यांत्रिकीकरण विभागाच्या गैरहजर अधिकाऱ्यांनी बैठकीला पाठविलेल्या प्रतिनिधीलाही काहीच माहिती नसल्याने ‘तुम्ही नेमके येथे येता तरी कशाला? असा सवाल करीत आ.रामराव वडकुते यांनी अर्ध्यावर बैठकच बरखास्त केली.

ठळक मुद्दे विविध गावांतील पाणीसमस्येने गाजली आढावा बैठक; सूचना दिलेले अधिकारीही होते गायब

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील न. प. कल्याण मंडपम्मध्ये ४ एप्रिल रोजी पंचायत समितीच्या वतीने आ. तान्हाजी मुटकुळे यांच्या अध्यक्षतेखाली तर आ. डॉ. संतोष टारफे यांच्या सहअध्यक्षतेखाली घेतलेल्या पाणीटंचाई आढावा बैठक झाली. त्यात यांत्रिकीकरण विभागाच्या गैरहजर अधिकाऱ्यांनी बैठकीला पाठविलेल्या प्रतिनिधीलाही काहीच माहिती नसल्याने ‘तुम्ही नेमके येथे येता तरी कशाला? असा सवाल करीत आ.रामराव वडकुते यांनी अर्ध्यावर बैठकच बरखास्त केली.बैठकीस जि. प. अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, आ. तान्हाजी मुटकुळे, आ. रामराव वडकुते, आ. डॉ. संतोष टारफे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंता भागानगरे, तहसीलदार गजानन शिंदे, गटविकास अधिकारी ए. एल. बोंदरे, यांच्यासह जि. प व पं. स सदस्यांची उपस्थिती होती. हिंगोली तालुक्यात पाणी प्रश्न हा दरवर्षी गंभीर बनत असल्याने तो प्रत्येक टंचाई आढावा बैठकीत चर्चेचा ठरतो. तो याही बैठकीत चर्चेला आला होता. प्रारंभी पं. स. पाणीपुरवठा विभागाचे मुकूंद कारेगावकर यांनी टंचाई आराखड्यातील प्रस्तावित योजनांची गावनिहाय माहिती सांगितली. ती माहिती संपते न संपते तोच जि. प. सदस्य विठ्ठल चौतमल यांनी भारत निर्माण योजनांची परिस्थिती सांगून मागील १० वर्षांपासून किती योजना बंद आहेत, याचा आढावा घेण्याचे सांगितले. त्यातच मुख्य म्हणजे हिंगोली तालुक्यातील पिंपरखेड येथील २००८ -२००९ मध्ये २० लाख रुपयांतून करण्यात आलेली योजना धूळखात पडण्याचीही कारणे विचारली त्यामुळे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी ती योजना बंद असल्याची सांगित असलेली कारणे मान्यच केले जात नव्हते. तसेच बहुतांश गावातील सरपंचानीही पाणीसमस्या प्रत्यक्ष उभे राहून सांगितल्या. तसेच मागील वर्षीच्या अधिग्रहणाची देयकेही अद्यापपर्यंत शेतकºयांना मिळालेली नसल्याचे सांगितल्यावर ती बिले लवकर देण्याचे ग्रामीण पुरवठा विभागाच्या अधिकाºयांना आ. तान्हाजी मुटकूळे यांनी सांगितले. तर उपस्थित असलेल्या सरपंचाला आप-आपल्या गावातील पाण्याच्या समस्या सांगण्यास सुचविले होते.मात्र दोन ते तीन सरपंच वगळता एकही सरपंच समस्या सांगण्यास पुढे आले नसल्याने निदान आप- आपल्या गावातील समस्या लिखित स्वरुपात तरी शिक्का मारुन देण्याचे कळविले. तेव्हा कुठे लिखित समस्या घेऊन सरपंच पतीच्या रांगा लागल्याचे दिसून आले. तर विहिरीसाठी अंतराचे प्रमाणपत्र कोणी द्यावे? हाही गुंता ग्रासेवक संघटनेचे अध्यक्ष शिवाजी खरात यांनी मांडल्यानंतर त्यावर चर्चा होऊन ते प्रमाणपत्र केवळ भुजल सर्व्हेक्षण विभागाने देण्याचेच ठरले. त्यामुळे ग्रामसेवकांवरील प्रमाणपत्रांचा ताण कमी होण्यास मदत झाली आहे.चर्चा : सभापती, उपसभापतींची दांडीपंचायत समितीची पाणीटंचाई बैठक असल्याने त्या बैठकीस पं. स. सभापती व उपसभापती यांनी उपस्थित राहणे गरजेचे असतानाही तेच या बैठकीस हजर राहिले नसल्याने त्यांची पाठी मागे बसलेल्या सरंपचामध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. तसेच याही बैठकीस जास्तीत जस्त पतीराजही उपस्थित होते.त्याचबरोबर एका गावची सरपंच महिला वगळता इतर सर्वच गावच्या सरपंचाचेच पती बैठकीस उपस्थित असल्याने ते आप- आपल्या गावातील पाणी समस्या सांगण्यासाठी पुढे येण्याचे टाळत असल्याचेही चित्र टंचाई आढावा बैठकीत दिसून आले.पैसे घेतल्याशिवाय कामे होत नसल्याच्या तक्रारी४हिंगोली तालुक्याला मग्रारोहयो अंतर्गत एकूण १० हजार विहिरी मंजूर आहेत. त्यापैकी २ हजार विहिरींचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित विहिरींची कामे वेळीच करण्यासाठी वरिष्ठ विभागाने लक्ष देवून प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र पं.स.कार्यालयात पैसे घेऊन कामे होत असल्याच्या अनेक तक्रारी शेतकरी करीत असल्याचे आ.मुटकुळे यांनी बैठकीत सांगितले. त्यामुळे कोणत्याही शेतकºयाने विहिरीच्या मंजुरीसाठी किंवा मस्टरसाठी कोणत्याही अधिकाºयाला पैसे देण्याची गरज नाही. कुणी मागणी केल्यास ‘आम्हा तीन्हीही आमदारांना निसंकोच पणे फोन करा’ असे आ. तानाजी मुटकुळे यांनी उपस्थितांना आवाहन केले.टारफे यांचे नाव सुचविताच बैठकही संपली४बैठकीस उपस्थित असलेले आ. संतोष टारफे यांचे आ. मुटकुळे यांनी मार्गदर्शनासाठी नाव सुचविताच आ. वडकुते यांनी बैठक बरखास्त करण्याचे सुचविले. त्यामुळे आ. टारफे यांना उपस्थित ग्रामसेवक व सरपंचाना मार्गदर्शन करता आले नाही.बीडीओंची खुर्ची रिकामीच४गटविकास अधिकारी कधीही कार्यालयात हजर राहत नसल्याचा आरोप भटसावंगी तांडा येथील सरपंच श्रावण चव्हाण यांनी केला होता. त्यावर बीडीओ बोंदरे यांनी कदाचित मी कुठे बैठकीस गेलो असावा किंवा आजारी असेल म्हणून कार्यालयात नसेल, असे सांगितले. तर आ. मुटकूळे यांनी इतर सरपंचांनाही विचारणा करत बीडीओंना घरी न बसता कार्यालयात बसून कामे करण्याचे सुचविले.‘टँकरचाही आढावा घ्या’४सध्या पाणीटंचाईने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. ज्या गावातील टँकरचे प्रस्ताव आल्यास तेथील चौकशी करून टँकर वेळीच सुरू करण्याचे तहसीलदारांना आ.मुटकुळे यांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणीwater transportजलवाहतूकHingoli z pहिंगोली जिल्हा परिषद