शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

सेनगावमधून साहेबराव पाटील यांची बिनविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:29 IST

सेनगाव तालुक्यातील कवठा येथील सेवा सहकारी सोसायटी गटातील राजेंद्र रंगनाथराव देशमुख यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकी‌‌त सेनगाव गटातून माजी आ. ...

सेनगाव तालुक्यातील कवठा येथील सेवा सहकारी सोसायटी गटातील राजेंद्र रंगनाथराव देशमुख यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकी‌‌त सेनगाव गटातून माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांच्या पॅनलमधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या अर्जावर वेलतुरा येथील हिंमत खरबळ यांनी आक्षेप घेऊन देशमुख यांची संस्था थकीत असल्याने त्यांचे नाव मतदार यादीत नोंदू नये, अशी मागणी विभागीय उपनिबंधकांकडे केली होती. त्यानंतर विभागीय उपनिबंधकांनी त्यांची मागणी मान्य करून देशमुख यांचे मतदार यादीतील नाव वगळण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयास देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने विभागीय सहनिबंधकांचा आदेश रद्द करून देशमुख यांचे नाव मतदार यादीत घेण्याचे २ फेब्रुवारी रोजी आदेशित केले होते. या निर्णयास हिंमत खरबळ यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. याप्रकरणी सुनावणी होऊन सर्वोच्च न्यायालयाने औरंगाबाद खंडपीठाचा आदेश रद्दबातल ठरवून विभागीय सहनिबंधकांचा आदेश कायम ठेवला. यासंदर्भातील निकाल १५ मार्च रोजी देण्यात आला. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे बुधवारी राजेंद्र देशमुख यांचे मतदार यादीतील नाव वगळण्यात आले आहे. परिणामी त्यांची उमेदवारी आपोआप रद्द ठरली असून, साहेबराव पाटील गोरेगावकर हे बिनविरोध निवडले गेले आहेत.

यासंदर्भातील विभागीय सहनिबंधकांचा आदेश प्राप्त झाला आहे. त्यानुसार राजेंद्र देशमुख यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले आहे. परिणामी त्यांची उमेदवारी आपोआप रद्द झाली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दिली. दरम्यान, साहेबराव पाटील गोरेगावकर हे बिनविरोध निवडले गेल्याने आ. सुरेश वरपूडकर यांच्या गटासाठी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल दिलासा देणारा ठरला आहे.