येलकीत एप्रिलपासून सुरू होणार ३५० जवानांचे प्रशिक्षण केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:28 AM2021-03-06T04:28:49+5:302021-03-06T04:28:49+5:30

सशस्त्र सीमा बलाचे महानिदेशक कुमार राजेशचंद्रा यांच्याकडे खासदार सातव यांनी गतवर्षी येलकी येथे जवानांचे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची मागणी ...

A training center for 350 personnel will start from April in Yelki | येलकीत एप्रिलपासून सुरू होणार ३५० जवानांचे प्रशिक्षण केंद्र

येलकीत एप्रिलपासून सुरू होणार ३५० जवानांचे प्रशिक्षण केंद्र

Next

सशस्त्र सीमा बलाचे महानिदेशक कुमार राजेशचंद्रा यांच्याकडे खासदार सातव यांनी गतवर्षी येलकी येथे जवानांचे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी केंद्राकडे पाठपुरावा केल्याने सशस्त्र सीमा बलाकडून अधिकृत मंजुरी मिळाली. ६१ कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीबाबत डेप्युटी कमांडंट आर. के. सिंग यांनी आदेश दिला होता. ही प्रक्रियाही आता पूर्ण झाली आहे. या ठिकाणी आता १०० जवान कुटुंबीयांसह आले असून नियमित कामकाजही येथे सुरू झाले आहे. येथील सोयीसुविधांबाबत सीमा बलाच्या कमांडंट विनयकुमार सिंग यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे. त्यातच ३५० जणांचे प्रशिक्षण केंद्र एप्रिलमध्ये सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी या सोयीसुविधांची मागणी करण्यात आली आहे.

खासदार सातव यांनी सशस्त्र सीमा बलाच्या वरिष्ठ अधिकऱ्यांकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे येथे प्रशिक्षण वर्ग सुरू आहेत. यामुळे या भागाचे अर्थचक्र गतिमान होणार असून बाजारपेठेलाही चालना मिळणार आहे.

Web Title: A training center for 350 personnel will start from April in Yelki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.