शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कारने दुचाकीवरील तिघा वेटरला उडवले; ५०० मीटर फरफटत नेल्याने दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 12:18 IST

पुसेगाव फाट्यावर चारचाकीच्या धडकेत दोघे जागीच ठार, एकजण गंभीर जखमी

- सतीश घनमोडेपुसेगाव (जि. हिंगोली ):- हिंगोली सेनगाव रोडवरील पुसेगाव पाटीजवळ चारचाकी वाहनाच्या धडकेने दुचाकीला उडविले. या अपघातात दुचाकीवरील तिघांपैकी दोघांचा जागीची मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. गंभीर जखमीस नांदेड येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

पुसेगाव येथील गौतम धाबे, शेख सत्तार आणि बबन धाबे हे पुसेगाव पाटीवरील एका ढाब्यावर वेटर म्हणून कामाला होते. रोजच्याप्रमाणे तिघे आपले काम संपवून रविवारी रात्री दहाच्या सुमारास दुचाकीवरून घरी जाण्यासाठी निघाले होते. याचदरम्यान सेनगावकडून हिंगोलीच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. त्यानंतर दुचाकीला चारचाकी गाडीने फरफटत पाचशे मिटर पर्यंत नेले. त्यामध्ये दुचाकीवरील गौतम धाबे (वय ४८) आणि शेख सत्तार (वय ५०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर बबन धाबे हे गंभीर असल्यामुळे त्यांना नांदेड येथे उपचारासाठी हलविण्यात आले. घटनेची माहिती कळताच नरसी पोलिसानी घटनास्थळी धाव घेतली. आतापर्यंत कुणावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही. पोलिस चारचाकी वाहन चालकाचा शोध घेत आहेत.

वेगाला आवर बसणे गरजेचे...मागच्या काही दिवसांपासून अति वेगाने वाहने चालविण्याची स्पर्धा लागली आहे. उपप्रादेशिक विभागाने वेगाने जाणाऱ्या वाहनांवर वेळीच कारवाई करावी व वाहनाचा वेग कमी करण्यास भाग पाडावे, अशी मागणी पुढे येत आहे.

टॅग्स :AccidentअपघातHingoliहिंगोलीDeathमृत्यू