शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

'बार'मध्ये काम करणाऱ्या नोकरानेच लांबविली साडेतीन लाखांची रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 12:22 IST

Crime News in Hingoli सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दुकानातील नोकर अविनाश लांडे यानेच चोरी केल्याचे स्पष्ट झाले.

ठळक मुद्देजेनरेट रूमवरील पत्रे वाकलेले तसेच किचन रूमचे शटर उचललेले दिसले. काउंटरमध्ये ठेवलेली ३ लाख ५७ हजार १३० रुपयांची रक्कम गायब झाल्याचे आढळले

हिंगोली : येथील औंढा रोडवरील साई गार्डन बार ॲंड रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या नोकरानेच बार अँड रेस्टॉरंटमध्ये डल्ला मारीत काउंटरमधील ३ लाख ५७ हजार १३० रुपयांची रक्कम लांबविल्याची घटना ८ जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोकराविरुद्ध गुन्हा नोंद झाला.

हिंगोली शहरातील वंजारवाडा भागातील शिवाजी दत्तराव बांगर यांचे औंढा रोडवर साई गार्डन बार अँड रेस्टॉरंट आहे. त्याच्या दुकानात अविनाश लांडे (रा. गोवर्धन, ता. रिसोड) हा नोकर म्हणून कामाला होता. ७ जुलै रोजी शिवाजी बांगर यांनी दुकानाच्या काउंटरमध्ये ३ लाख ५७ हजार १३० रुपयांची रक्कम ठेवली होती. ८ जुलै रोजी सकाळी दहा वाजता बांगर हे दुकानामध्ये गेले असता त्यांना जेनरेट रूमवरील पत्रे वाकलेले तसेच किचन रूमचे शटर उचललेले दिसले. चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी काउंटरची तपासणी केली असता काउंटरमध्ये ठेवलेली ३ लाख ५७ हजार १३० रुपयांचे रक्कम गायब झाल्याचे दिसले.

त्यांनी ही घटना हिंगोली ग्रामीण पोलिसांना कळविली. त्यावरून सपोनि बळीराम बंदखडके, पोह गजानन पोकळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.  दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दुकानातील नोकर अविनाश लांडे यानेच चोरी केल्याचे स्पष्ट झाले. चोरी केल्यानंतर अविनाश लांडे फरार झाला. याप्रकरणी शिवाजी बांगर यांच्या फिर्यादीवरून नोकर अविनाश लांडे याच्याविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोह गजानन पोकळे करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली