शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत व्हेंटिलेटरची कमतरता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:30 IST

हिंगोली: जिल्ह्यात सद्य:स्थितीत एकूण ९७ व्हेंटिलेटर उपलब्ध असून जिल्हा मुख्यालयात ३७ सद्य:स्थितीत कार्यरत आहेत. कोरोना संसर्ग वाढू लागल्याने नागरिकांनी ...

हिंगोली: जिल्ह्यात सद्य:स्थितीत एकूण ९७ व्हेंटिलेटर उपलब्ध असून जिल्हा मुख्यालयात ३७ सद्य:स्थितीत कार्यरत आहेत. कोरोना संसर्ग वाढू लागल्याने नागरिकांनी जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. नागरिकांना वेळोवेळी आवाहन करुनही ते मास्कचा वापर करताना दिसून येत नाहीत. परिणामी, जिल्हा प्रशासनाला टाळेबंदीसारखा निर्णय घ्यावा लागत आहे. अतीगंभीर रुग्ण असेल तर त्याला व्हेंटिलेटरवर ठेवले जात आहे. जिल्ह्यातील हिंगोली जिल्हा रुग्णालयात ३७, औंढा रोडवरील कोरोना केअर सेंटरमध्ये २०, वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात २० आणि कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात २० असे व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक केंद्रात व्हेंटिलेटर नाही. तेथे जर अतिगंभीर रुग्ण आढळून आले तर त्यास तातडीने जिल्हा रुग्णालयात पाठविले जावून त्यास व्हेंटिलेटरवर ठेवले जावून त्याची काळजी घेतली जाते.

मास्क वापरण्याचे आवाहन

कोरोना संसर्गाने सर्वत्र डोके वर काढले आहे. ही कोरोनाची दुसरी लाट असल्याचे शासनाने जाहीरही केले आहे. परंतु, नागरिक याकडे कानाडोळा करीत आहेत. दुसरीकडे तरुणमंडळी मास्कचा वापर ‘फॅशन’ म्हणून करीत आहे. बाहेर पडताना मास्कचा योग्य पद्धतीने वापर केल्यास कोरोनापासून दूर राहता येते. विशेष म्हणजे व्हेंटिलेटरची वेळही येणार नाही. तेव्हा मास्कचा वेळेवर वापर करावा, असे आवाहन निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम यांनी केले आहे.

गोळ्यांपेक्षा भाकरी बरी....जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन केले तर कोरोना आपल्याजवळ येतो हे माहित असतानाही अनेक जण विनामास्क आणि विनाकारण बाहेर पडत आहेत. एकदा पॉझिटिव्ह रुग्ण जवळून गेला तर लगेच त्याचा संसर्ग होण्याची भीती असते. त्यानंतर अँटीजन तपासणी केली तर दवाखान्याच्या गोळ्या खाण्याची वेळ ओढावते. तेव्हा गोळ्या खाण्यापेक्षा घरची भाकरी सुखाने खावी, असा सल्लाही तज्ज्ञ डॉक्टर मंडळींनी दिला आहे.

प्रतिक्रिया

कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. अतिगंभीर रुग्ण असेल तर त्याला व्हेंटिलेटरही दिले जात आहेत. व्हेंटिलेटरची कमतरता जिल्हा रुग्णालयात सध्या भासत नाही. पुरेशा प्रमाणात व्हेंटिलेटर सर्वत्र आजमितीस आहेत. अतिगंभीर रुग्णांची काळजी डॉक्टर मंडळी घेत आहेत.

डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक