दरोडा प्रकरणातील आरोपींकडून तलवार जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:27 IST2021-03-22T04:27:02+5:302021-03-22T04:27:02+5:30

सुराणा नगरात राज्य राखीव पोलीस दलातील जवान आर.व्ही. त्रिमुखे यांच्या घरी ७ मार्चच्या पहाटे १२ ते १३ दरोडेखोरांनी तलवारीचा ...

Sword seized from accused in robbery case | दरोडा प्रकरणातील आरोपींकडून तलवार जप्त

दरोडा प्रकरणातील आरोपींकडून तलवार जप्त

सुराणा नगरात राज्य राखीव पोलीस दलातील जवान आर.व्ही. त्रिमुखे यांच्या घरी ७ मार्चच्या पहाटे १२ ते १३ दरोडेखोरांनी तलवारीचा धाक दाखवून अडीच लाखांचा ऐवज लुटला होता. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.आर. बंदखडके यांनी तपासाची चक्रे फिरवून सर्व आरोपींच्या मुसक्या आवळल्या. तसेच सोन्याच्या दागिन्यांसह गुन्ह्यात वापरलेली दोन वाहने, मोबाइल आदी जप्त केले होतेे. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली तलवार कळमकोंडा शिवारात फेकून दिल्याचे सांगितले होते. त्यानुसार सपोनि बंदखडके यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार रवि हारकळ, अशोक धामणे, गजानन पोकळे, शेख महमद यांच्या पथकाने कळमकोंडा शिवारातून तलवार जप्त केली. दरम्यान, आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांची कारागृहात रवानगी केली.

Web Title: Sword seized from accused in robbery case