किरकोळ कपडा व्यापाऱ्याची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 14:42 IST2024-06-07T14:42:13+5:302024-06-07T14:42:38+5:30
आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव नारायण रामलाल बाहेती (वय ५०) असे आहे. बाहेती यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती ग्रामस्थांनी कळमनुरी पोलिसांना दिली.

किरकोळ कपडा व्यापाऱ्याची आत्महत्या
हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील मसोड येथील एका किरकोळ कपडा व्यापाऱ्याने काही कारणाने आपल्या राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ६ जूनच्या मध्यरात्री घडली.
आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव नारायण रामलाल बाहेती (वय ५०) असे आहे. बाहेती यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती ग्रामस्थांनी कळमनुरी पोलिसांना दिली. सदर माहिती मिळताच फौजदार गजानन कांगणे, जमादार माधव भडके, संजय राठोड, माधव डोखळे, प्रशांत शिंदे आदींनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. बाहेती हे जवळपास पंधरा वर्षापासून त्यांच्या कुटुंबापासून वेगळे राहत होते. मयताच्या खिशामध्ये हिशोबाची चिट्ठी सापडली आहे