शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी औंढ्यात रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 11:40 PM

येथील जुन्या बसस्थानकाजवळ वन विभागाच्या कार्यालयासमोरील राज्य रस्त्यावर रिपब्लिकन सेनेच्या वतीने एक तास रास्ता रोको आंदोलन करून वन्य प्राण्यांच्या बंदोबस्ताची मागणी केली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : येथील जुन्या बसस्थानकाजवळ वन विभागाच्या कार्यालयासमोरील राज्य रस्त्यावर रिपब्लिकन सेनेच्या वतीने एक तास रास्ता रोको आंदोलन करून वन्य प्राण्यांच्या बंदोबस्ताची मागणी केली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.तालुक्यात सध्या खरिपाचा हंगाम बहरला आहे. परंतु वन्य प्राणी उभे पीक फस्त करून नासाडी करत पिकाचे मोठे नुकसान करत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला असून शेतात गेलेल्या शेतकऱ्यावर हे वन्यप्राणी हल्लेही करत आहेत. त्यामुळे तालुक्यात अनेक शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांनी जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत. आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे त्रस्त असलेल्या शेतकरी आता वन्यप्राण्यांमुळे त्रस्त झाला आहे. माळाकडची शेती या प्राण्यांनी फस्त केलेली आहे. त्यामुळे या शेतकºयांवर खरिपातील पिके गेल्याने उपासमारीची वेळ आली आहे. दलित, आदिवासी, बंजारा व इतर समाजातील लोकांच्या वहितीत असलेल्या शेतजमिनी वृक्षलागवडीच्या नावाखाली वन विभागाने ताब्यात घेणे थांबवावे, वन्य प्राण्यांपासून शेतकºयांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी शेतकºयांना शस्त्र वापरण्याची परवानगी द्यावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन वनपरिक्षेत्र अधिकारी माधव केंद्रे यांना देण्यात आले. मागण्या त्वरित पूर्ण न झाल्यास गावा-गावात विभागाच्या विरोधात आंदोलन केले जातील, असा इशाराही जिल्हाप्रमुख किरण घोंगडे यांनी दिला.यावेळी आयोजक रिपब्लिकन सेनेचे जिल्हाप्रमुख किरण घोंगडे, गोरख खिल्लारे, पंडित खिल्लारे, बाळासाहेब घनसावंत, रंगनाथ चव्हाण, भीमराव पानपट्टे, हनवता शिंदे, वामन चव्हाण, प्रकाश जाधव, सुनील खंदारे, माधव सोळंके, सुभाष सोळंके, विजय बलखंडे, यशवंत साळवे, कोंडाबाई पंडित, कलावतीबाई थोरात, सुधाकर मोगरे, करण वाघमारे, नितीन ढगे, हरिभाऊ चव्हाण, प्रमोद काचगुंडे, हनुमान काचगुंडे, भगवान खिलारे, मिलिंद घोंगडे आदींसह तालुक्यातील सिद्धेश्वर, गोळेगाव, सुरवाडी, अंजनवाडा, तळणी, सावंगी, ढेगज, वडचुना, दुरचूना, ब्राह्मणवाडा, सुकापूर, ढेगज गावातून शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, या आंदोलनात सहभागी झालेले शेतकरी पाहून अनेक राजकीय नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. दरम्यान, पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, उपनिरीक्षक राहुल तायडे, जमादार यशवंत गुरुपवार, जमादार अफसर पठाण, खिजर पाशा यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :HingoliहिंगोलीMorchaमोर्चा