शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईसाठी जाणारी एसटी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:29 IST

हिंगोली: मुंबई या मोठ्या शहरासाठी हिंगोली ते मुंबई अशी कोरोनाआधी बस सुरू होती, परंतु गत महिन्याभरापसून ही बस बंदच ...

हिंगोली: मुंबई या मोठ्या शहरासाठी हिंगोली ते मुंबई अशी कोरोनाआधी बस सुरू होती, परंतु गत महिन्याभरापसून ही बस बंदच आहे. त्यामुळे महामंडळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतही कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. मार्च महिन्यात पहिल्या आठवड्यात १ ते ७ मार्च दरम्यान सर्वच बसेस बंद होत्या. आता २९ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान बसेस बंद केल्या आहेत. यामुळे एकंदर एसटी महामंडळाला चांगलाच फटका बसत आहेत. आधीच एसटी महामंडळाला प्रवासी मिळेना झाले आहेत. त्यात दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट घोंगावत असल्यामुळे एसटी महामंडळ तोट्यात आले आहे.

बॉक्स

दोन फेऱ्या रोज

कोरोना आधी हिंगोलीवरून मुंबईला जाणारी बस होती. नित्यनेमाने ही बस चालायची. उत्पन्नही चांगले असायचे, परंतु मार्च, २०२० पासून हिंगोली ते मुंबई या बसला कोरोनाची दृष्ट लागली आहे. बस बंद असल्यामुळे उत्पन्नात घट झाली आहे.

बॉक्स

रातराणी एक

हिंगोली मुख्यालयातून हिंगोली ते पुणे ही रातराणी बस आहे. कोरोनाचे रुग्ण परभणी येथे वाढल्यामुळे ही बस सध्या रिसोड मार्गे सोडण्यात येत आहे. या रातराणी बसला पूर्वी चांगले उत्पन्न असायचे, परंतु हल्ली हे उत्पन्न कमी होऊ लागले आहे.

बॉक्स

मुंबईसाठी वेटिंग नाही

कोरोनाआधी मुंबईसाठी वेटिंग राहायचे, परंतु कोरोनामुळे प्रवासी मुंबईसाठी जात नाहीत. त्यामुळे वेटिंगचा प्रश्नच उरत नाही. सहजरीत्या हिंगोली ते मुंबई या गाडीचे रिझर्व्हेशन मिळत आहे.

प्रतिक्रिया

पर जिल्ह्यातील आणि लांब पल्ल्याच्या बसेसला कोरोना आधी चांगले उत्पन्न व्हायचे, परंतु कोरोनामुळे एसटीच्या उत्पन्नात घट झाली आहे. प्रवासी संख्याही म्हणावी तेवढी मिळत नाही. त्यामुळे महामंडळाचे नुकसान होत आहे.

- एस.पी. गोरे, वाहतूक निरीक्षक

जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांची संख्या घटली

कोरोना महामारीमुळे जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. काही प्रवासी खासगी वाहने करून प्रवास करू लागले आहेत. जे काही सूज्ञ ग्राहक आहेत, ते महामंडळाच्या बसेसने प्रवास करतात, परंतु कोरोना संसर्गामुळे तेही मागेपुढे पाहू लागले आहेत.

फोटो