शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

सगळीकडे सारखेच चित्र; कापूस, तूर आडवी झाल्याने संकट वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 16:02 IST

गंजीतच लागली सोयाबीनला बुरशी

- इलियास शेख 

कळमनुरी (जि. हिंगोली) : तालुक्यात पडलेल्या परतीच्या पावसाने खरिपाची पिके उद्ध्वस्त झाली असून, वर्ष कसे काढावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. गंजीतच सोयाबीनला बुरशी लागली असून, सगळीकडे सारखेच चित्र दिसत आहे. पाण्यात गेलेली पसर कुजल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

परतीच्या पावसाने ५३ हजार ९७ हेक्टरवरील सोयाबीन, कापूस, तूर आदी पिके पाण्याखाली गेली आहेत.  आत्महत्या अथवा स्थलांतराशिवाय पर्याय नसल्याचे सेलसुरा येथील शेतकऱ्यांनी सांगितले.  शेतात  जावू वाटत नाही, असे उत्तम पाईकराव, विक्रम घुगे, ग्यानबाराव घुगे, बालाजी घुगे, चंद्रभागा घुगे आदींनी सांगितले. सोयाबीनच्या गंज्या आतून सडल्या व शेंगांना बुरशी आली. शेंगांना कोंब फुटत आहेत. झाकून ठेवलेले सोयाबीनही गेले. कापूस, तूर आडवी पडली आहे. तुरीचा फुलोरा झडला असल्याचे सेलसुरा येथील शेतात गेल्यानंतर दिसून आले. दोन दिवसांपूर्वी तहसीलच्या पथकाने पिकांचा सर्वे केला, सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी,  अशी मागणी कृष्णाजी घुगे, पुरूषोत्तम घुगे, चंद्रभागा घुगे यांनी केली.  एका शेतातील काढून ठेवलेले सोयाबीन जमा करत असलेल्या सरस्वती घुगे, लक्ष्मीबाई मुंडे, सारीका घुगे, सुमनबाई घुगे, गोकर्णा घुगे, जयश्री घुगे या महिलांनी सांगितले की, यावर्षीच्या पावसाने सर्वच पिकांची वाट लावली. पहिल्यादांच परतीच्या पावसाने एवढे नुकसान झाले. शासनाने त्वरित भरीव मदत करावी, असेही त्या म्हणाल्या. या परतीच्या पावसाने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. बियाण्याचेही पैसे निघणे शक्य नाही. जगणे कठीण झाले आहे. सेलसुरा येथील उत्तम पाईकराव यांच्या दोन एकर क्षेत्रावरील पिके  गेल्याचे त्यांनी सांगितले. वसपांगऱ्याचे शेषराव नागरे यांची ५ एकर  सोयाबीनची गंजी सडली.  पिकांचे पंचनामे झाले नाहीत. आपण ४ नोव्हेंबर रोजी तलाठ्याला भेटलो, परंतु त्यांनी माझ्याकडे १५ ते १६ गावे  आहे. मी सर्वे करण्यासाठी नंतर येतो, असे  सांगितल्याचे नागरे यांनी सांगितले.  

मुलाबाळांचे लग्न, शिक्षण, आजारपणासाठी पैसे आणावेत कोठून? मुलाबाळांचे लग्न, त्यांचे शिक्षण, आजारपण, खावे काय, जगावे कसे? अशा अनेक प्रश्नांचा भडीमारही शेताच्या बांधावर शेतकऱ्यांनी केला. या गावात ज्वारीचा पेरा अत्यल्प प्रमाणात आहे. सोयाबीन, कापूस ही मुख्य पिकेच हातची गेली आहेत. आता रबीच्या पिकावरच आमची भिस्त असल्याचे शेषराव नागरे, बबन नागरे यांनी सांगितले.  

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीHingoliहिंगोलीRainपाऊस