वारंगा फाटा येथे भरदिवसा दोन घरे फोडून लाखोचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 18:13 IST2018-11-10T18:12:38+5:302018-11-10T18:13:55+5:30
वारंगा फाटा येथील भवानी नगरमधील दोन घरांमध्ये शुक्रवारी (दि.९) भरदिवसा धाडसी चोरी झाली.

वारंगा फाटा येथे भरदिवसा दोन घरे फोडून लाखोचा ऐवज लंपास
हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथील भवानी नगरमधील दोन घरांमध्ये शुक्रवारी (दि.९) भरदिवसा धाडसी चोरी झाली. यात चोरट्यांनी ३ लाख ८८ हजार ८०० रुपयाचा ऐवज लंपास केला.
कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथील डॉ. पांडुरंग मारोतराव हेंद्रे यांची पत्नी व मुले दिवाळी सणानिमित्त माहेरी गेले होते. शुक्रवारी नेहमीप्रमाणे डॉक्टर हेंद्रे सकाळी १० वाजता दवाखान्यात गेले. याच दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून सोने-चांदी व रोख रक्कम लंपास केली. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास डॉ. हेंद्रे घरी परत आले असता हा प्रकार उघडकीस आला.
यासोबतच या परिसरातील ओमकार किशनराव वंजे यांच्याही घराचे कुलूप तोडून लॉकरमधील ७५ हजार ८०० रुपयाचा ऐवज चोरून नेला. घटनेची माहिती मिळताच पोनि व्यंकटेश केंद्रे यांनी कर्मचाऱ्यासह घटनास्थळी धाव घेतली.