शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
4
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
5
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
6
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
7
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
8
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
9
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
10
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
11
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
12
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
13
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
14
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
15
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
16
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
17
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
18
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
19
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
20
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

कोविड वाॅर्डात नातेवाइकांनी येऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:31 IST

हिंगोली : कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने नातेवाइकांनी कोरोना वाॅर्डात येऊ नये, अशा सूचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्या आहेत. ...

हिंगोली : कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने नातेवाइकांनी कोरोना वाॅर्डात येऊ नये, अशा सूचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्या आहेत. मात्र, १ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक भेट दिली असता १० नातेवाईक या वॉर्डात आढळून आले. त्यामुळे त्यांना तातडीने कोरोना केअर सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे.

हिंगोलीतील ॲक्टिव्ह असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या ७६१ वर पोहोचली आहे. गंभीर व अतिगंभीर असलेल्या ११९ रुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या ठिकाणी नातेवाइकांनी येऊ नये, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्या आहेत. मात्र, त्यानंतरही काही रुग्णांचे नातेवाईक या ना त्या कारणाने येत आहेत.

दरम्यान, गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी जयवंशी यांनी शासकीय रुग्णालयाच्या कोरोना वॉर्डाला अचानक भेट दिली. जिल्हाधिकारी आल्याचे समजताच आरोग्य प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. यावेळी जयवंशी यांनी रुग्णांशी संवाद साधून आरोग्य सेवा व इतर सुुविधांबाबत माहिती घेतली. गंभीर व अतिगंभीर रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यासोबतच त्यांच्यावर २४ तास लक्ष ठेवण्याच्या सूचनाही दिल्या.

यावेळी काही रुग्णांजवळ त्यांचे नातेवाईक आढळून आले. जयवंशी यांनी रुग्णांच्या १० नातेवाइकांना रुग्णवाहिकेत बसवून कोरोना केअर सेंटरला पाठविले. रुग्णांसोबत नातेवाईक आढळल्यास त्यांना तातडीने कोरोना केअर सेंटरला पाठविण्याच्या सूचनाही आरोग्य कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

फोटो : ७