शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

मृतदेह बाहेर काढताच नातेवाईकांचा टाहो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 00:55 IST

हिंगोली तालुक्यातील देवठाणा भोयर येथील युवक टनका येथील पैनगंगा नदीत बुडालेल्या युवकाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पाण्याबाहेर काढला. तो पाहताच नातेवाईकांनी एकच टाहो फोडला.

लोकमत न्यूज नेटवर्ककनेरगावनाका: हिंगोली तालुक्यातील देवठाणा भोयर येथील युवक टनका येथील पैनगंगा नदीत बुडालेल्या युवकाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पाण्याबाहेर काढला. तो पाहताच नातेवाईकांनी एकच टाहो फोडला.शंकर भोयर हा काका व मित्रासोबत रविवारी सकाळी व्यायाम करून कापूरखेडा जवळील पैनगंगा नदीवर पोहण्यास गेला होता. पोहत असताना तो पाण्यात बुडाला. सोबतच्यांनी त्याला वाचविण्याचे प्रयत्न केले, पण पाण्याच्या प्रवाहात तो खोलवर बुडाला. परिसरातील पैनगंगा नदीवर गर्दी केली होती. रविवारी दिवसभर व रात्री उशिरापर्यंत शोध सुरूच होता. बचाव पथक पहिल्या दिवशी वापस गेले व दुसºया दिवशी पथक घटनास्थळी दाखल झाले. अन् शोधकार्यास पुन्हा सुरूवात केली. यावेळी शंकरचा मृतदेह पाण्यात आढळून आला. ज्या ठिकाणावरून शंकरने पाण्यात उडी मारली होती त्याच परिसरात जवळपास ३० फूट पाण्यात खोलवर त्याचा मृतदेह खड्ड्यात फसलेला होता. बचाव पथकाच्या अथक परिश्रमानंतर शंकरचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. यावेळी नातेवाईकांनी शंकरचा मृतदेह पाहताच टाहो फोडला. घटनास्थळी आ. तान्हाजी मुटकुळे यांच्यासह ग्रामीण पोलीस ठाण्याचे अंगद सुडके व वाशिम ग्रामीणचे पोलीस कर्मचारी तैनात होते. दोन दिवस पाण्यात शंकरचा मृतदेह असल्याने तो छिन्न- विच्छिन्न झाला होता. त्यामुळे घटनास्थळी शवविच्छेदन केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.शंकरला डोळे भरून पाहण्यासाठी ग्रामस्थांच्या नजरा लागल्या होत्या. शंकर उत्कृष्ट कुुुस्तीपटू होता, तो नेहमीच व्यायाम व पोहण्यासाठी नदीकाठी येत असे. वाशिम जिल्ह्यातील पिंजर येथील संत गाडगेबाबा आपातकालीन शोध-बचाव पथकाने शंकरचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. मृतदेहाचा शोध घेण्यासाठी पथक प्रमुख दीपक सदाफळे व त्यांच्या सात सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. स्थानिक प्रशासन असतानाही आधार मात्र एका सेवाभावी संस्थेचा घ्यावा लागला. त्यामुळे आपातकालीन घटना घडल्यास प्रशासकीय यंत्रणा किती तत्पर आहे, हे यावेळी दिसून आले. ९ सप्टेंबर रोजी शोकाकुल वातावरणात मयत शंकर भोयर यांच्या पार्थिवावर देवठाणा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoli policeहिंगोली पोलीस