अर्भकाच्या मृत्यूने नातलग संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 23:30 IST2019-01-08T23:30:14+5:302019-01-08T23:30:35+5:30
शहरातील एका खाजगी रूग्णालयात बालकाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईक संतप्त झाले होते.

अर्भकाच्या मृत्यूने नातलग संतप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातील एका खाजगी रूग्णालयात बालकाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईक संतप्त झाले होते.
तेरा दिवसांच्या नवजात बालकावर मागील दोन दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र तिसऱ्या दिवशी म्हणजेच ८ जानेवारीला डॉक्टरने सदर बालकास पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यास सांगितले. बालकाच्या नातेवाईकांनी त्यास हिंगोली येथीलच दुसºया एका खाजगी दवाखान्यात ८ जानेवारी रोजी दाखल केले. यावेळी तेथील डॉक्टरांनी बालक तीन तासांपूर्वीच मयत झाल्याचे सांगितले अन् बाळाच्या आईने व नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. संतप्त नातेवाईकांनी मृत बालकास परत त्याच दवाखान्यात आणून प्रेत डॉक्टरासमोर ठेवले. जाब विचारला की, बाळ मयत होऊन तीन तास झाले होते. ही बाब लक्षात तुम्ही का आणून दिली नाही, असे म्हणत डॉक्टरांना धारेवर धरले. परंतु डॉक्टरने याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. या घटनेमुळे रूग्णालय परिसरात एकच गर्दी झाली होती. मृत बालकाचे वडील सचिन पोघे (रा. कडती, ता. सेनगाव, जि.हिंगोली) बालकास हिंगोलीत खाजगी दवाखान्यात ६ जानेवारीला उपचारासाठी दाखल केले होते. परंतु डॉक्टरांनी बालक मृत झाल्याचे सांगितलेच नाही. हिंगोली येथीलच दुसºया एका खाजगी दवाखान्यात नेले असता तेथील डॉक्टरने बालक मृत असल्याचे सांगितले, असे पोघे यांनी ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले. डॉक्टरने पैसे उकळण्यासाठीच हा बनाव केला, असे नातेवाईक म्हणाले.