शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना वाॅर्डात काम करणाऱ्यांचे क्वारंटाइन झाले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:30 IST

कोरोनाचा कहर वाढल्याने आता बहुतांश डॉक्टरांना कोरोनाच्या वाॅर्डात कामाला लावले जात आहे. त्यातच नियमित सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात ...

कोरोनाचा कहर वाढल्याने आता बहुतांश डॉक्टरांना कोरोनाच्या वाॅर्डात कामाला लावले जात आहे. त्यातच नियमित सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कंत्राटी भरती करून या कर्मचाऱ्यांनाही कोराेनाच्या वाॅर्डात काम दिले जात आहे. पूर्वी अशा वाॅर्डात काम करणाऱ्यांना १४ दिवसांनंतर पाच दिवस क्वारंटाइन केले जात होते. थेट कुटुंबीयात मिसळल्यास कुटुंबीयांनाही या आजाराचा धोका होऊ नये, यासाठी ही काळजी घेतली जात होती. घरातील लहान मुले, वृद्धांना याचा फटका बसू नये, यासाठी ही काळजी होती. आता आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी बहुतांश जणांचे लसीकरण झाले. ६० टक्के कर्मचाऱ्यांनी तर दुसरी लस घेतली. यातील अनेकांच्या कुटुंबीयांतील वयोवृद्ध अथवा गंभीर आजाराच्या रुग्णांनीही लस घेतली. त्यामुळे या कुटुंबीयांना तेवढा धोका राहिला नसल्याने क्वारंटाइन करण्याचे आता टाळले जात आहे. त्यातच वाढत्या रुग्णसंख्येमुळे कर्मचारी अपुरे पडत असल्यानेही, असे केले जात आहे.

जिल्ह्यातील कोविड सेंटर ८

यामध्ये कार्यरत कर्मचारी - ४५०

माझ्या घरात पत्नी, आई-वडील, काका, काकू, भाऊ, त्यांची मुले अशी मंडळी आहे. पूर्वी चौदा दिवसांनंतर क्वारंटाइन केले जायचे. आता माझ्यासह घरातील सर्व मोठ्यांचे लसीकरण झाले. घरात मी विलगीकरणात राहतो. ड्यूटी असलेल्या दिवशी योग्य ती खबरदारी घेऊनच कुटुंबीयांशी दूरवरून संपर्क ठेवतो. घरातही मास्क वापरतो, असे एका डॉक्टरांनी सांगितले.

माझ्या घरात सासू, सासरे, त्यांची आई, लहान मुले आहेत. पतीही आरोग्य सेवेतच असल्याने आम्ही मुलांना कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. तेच त्यांची काळजी घेतात. वृद्धांचे लसीकरण झाले. मात्र, तरीही आम्ही शक्य तेवढे त्यांच्यापासून दूर राहतो. तरीही कधीतरी मुले जवळ येतात. त्याची काळजी वाटते, असे एका परिचारिकेने सांगितले.

आता कोरोनामध्ये बऱ्याच काळापासून काम करीत असल्याने चांगला अनुभव आला. कुटुंबीयांपैकी वृद्धांचे लसीकरण झाले. त्यामुळे पूर्वीसारखे क्वारंटाइन केले जात नसावे. शिवाय आता रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे आधीच कर्मचारी कमी असल्याने सुटीच्या दिवशीही येण्याची वेळ येत आहे, असे एका ब्रदरने सांगितले.

कोरोना वाॅर्डात काम करणाऱ्या जवळपास कर्मचाऱ्यांचे, त्यांच्या कुटुंबातील वयोवृद्ध व गंभीर आजारी रुग्णांचे लसीकरण झाले आहे. त्यातच या कर्मचाऱ्यांना आता या वाॅर्डात काम करण्याचा चांगला अनुभव आला आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कर्मचारी अपुरे आहेत. त्यामुळे क्वारंटाइन केल्यास सेवेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे असे क्वारंटाइन केले जात नाही.

डॉ.राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक