१३ जुगाऱ्यांकडून पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:31 IST2021-03-23T04:31:38+5:302021-03-23T04:31:38+5:30

जवळा बाजार येथील जुगार अड्डयावर स्थागुशाखेची कारवाई जवळा बाजार (जि.हिंगोली) : येथील झन्ना मन्ना नावाच्या जुगार अड्ड्यावर स्थागुशाच्या पथकाने ...

Property worth Rs 54 lakh seized from 13 gamblers | १३ जुगाऱ्यांकडून पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

१३ जुगाऱ्यांकडून पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

जवळा बाजार येथील जुगार अड्डयावर स्थागुशाखेची कारवाई

जवळा बाजार (जि.हिंगोली) : येथील झन्ना मन्ना नावाच्या जुगार अड्ड्यावर स्थागुशाच्या पथकाने छापा टाकत ३ लाख ७६ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करत, १३ जुगाऱ्यावर गुन्हे दाखल केले आहेत. ही कारवाई २१ मार्चच्या रात्री ८ वाजेच्या सुमारास करण्यात आली.

जवळा बाजार येथे जुगार अड्यावर काही जण जुगार खेळत असल्याची माहिती स्थागुशा पथकाला मिळाली होती. त्यानुसार २१ मार्चच्या रात्री ८ वाजेच्या सुमारास जवळा बाजार येथील सलीम खान पठाण यांच्या जागेतील जुगार अड्ड्यावर छापा मारला. यावेळी १३ जण जुगार खेळत असल्याचे आढळून आले. जुगाऱ्यांकडून रोख १० हजार रूपयांसह ५ दुचाकी व ४ मोबाईल असा ३ लाख ७६ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी पोउपनि शिवसांभ घेवारे यांच्या फिर्यादीवरून पवन शिवप्रसाद जयस्वाल, सय्यद सत्तार सय्यद सरदार, शेख नईम शेख मोईन, जुनेद मामू, बबलू शेख, नदीम सय्यद, आमदू पैलवान, नफिज पैलवान, जागामालक सलीम खान पठाण (सर्व रा. जवळा बाजार), संतोष पांडुरंग चव्हाण (रा. आडगाव रंजे) तसेच दुचाकी सोडून पळून गेलेल्या ३ अशा एकूण १३ जुगाऱ्यांवर हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, पोनि उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि शिवसांब घेवारे, जमादार विशाल घोळवे, किशोर कातकडे, विठ्ठल काळे, तुषार ठाकरे यांच्या पथकाने केली.

Web Title: Property worth Rs 54 lakh seized from 13 gamblers