शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:29 IST

कहाकर (बु), कनेरगाव नाका, कापडसिंगी, नर्सी नामदेव, सवना, फाळेगाव, सिद्धेश्वर, नंदगाव, भोसी, ९ मे रोजी जिल्ह्यातील जांभळी, कळमनुरी, कोंढूर, ...

कहाकर (बु), कनेरगाव नाका, कापडसिंगी, नर्सी नामदेव, सवना, फाळेगाव, सिद्धेश्वर, नंदगाव, भोसी, ९ मे रोजी जिल्ह्यातील जांभळी, कळमनुरी, कोंढूर, पोत्रा, करंजी, आखाडा बाळापूर, कुरुंदा, दांडेगाव, जवळा बाजार, डोंगरकडा, डिग्रस कऱ्हाळे, औंढा नागनाथ व परिसर, जवळा बाजार व परिसर, पार्डी (खुर्द), दांडेगाव, जवळा पांचाळ आदींसह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये हलक्या व मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. अवकाळी पावसाबरोबर विजांचा कडकडाटही सुरू होता. दरम्यान, काही ठिकाणचा वीजपुरवठाही खंडित झाला होता.

सध्या जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी भुईमुगाची काढणी सुरू आहे. अवकाळी पावसामुळे भुईमुगाला चांगलाच फटका बसला आहे. काही शेतकऱ्यांचा कडबा अवकाळी पावसामुळे भिजला. गत दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण पहायला मिळत आहे. दुपारी ऊन व सायंकाळच्या वेळी ढगाळ वातावरण निर्माण होऊन तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे. यामुळे उन्हाळी शेतकामात शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

रविवारी पहाटे साडेचार वाजता सुरू झालेला पाऊस सकाळी सव्वानऊ वाजेपर्यंत सुरूच होता. अवकाळी पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. दुसरीकडे सिमेंट रस्त्यांवरून पाणी वाहत होते. एकंदर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे गारवा निर्माण झाला होता. दुपारच्या वेळेला शेतकरी शेतातील भुईमुगाच्या काड्यावर (चारा) ताडपत्री अंथरताना दिसत होते.

कनेरगाव नाका (फोटो नंबर २)

नर्सी नामदेव (फोटो नंबर ३)

दांडेगाव (फोटो नंबर ४)

जवळा पांचाळ (फोटो नंबर ५)