अपात्र शिधापत्रिका शोध मोहिमेला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:26 IST2021-04-03T04:26:19+5:302021-04-03T04:26:19+5:30

हिंगोली : राज्यभरात अपात्र शिधापत्रिका शोधण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतला ...

Postponement of ineligible ration card search operation | अपात्र शिधापत्रिका शोध मोहिमेला स्थगिती

अपात्र शिधापत्रिका शोध मोहिमेला स्थगिती

हिंगोली : राज्यभरात अपात्र शिधापत्रिका शोधण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतला असून, तसे आदेश काढण्यात आले आहेत. जिल्हाभरासह राज्यात बोगस शिधापत्रिका मोठ्या प्रमाणावर असल्याच्या तक्रारी अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे आल्या होत्या. त्यामुळे खरे लाभार्थी विविध योजनांपासून वंचित राहात असल्याचा आरोप होत होता. त्यामुळे अपात्र शिधापत्रिकांचा शोध घेण्यासाठी राज्यभरासह जिल्ह्यात शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. दिनांक १ फेब्रुवारी ते ३० एप्रिल या कालावधीत अपात्र शिधापत्रिकांचा शोध घेऊन तसा अहवाल शासनाला सादर करावयाचा होता. मात्र, अचानक या मोहिमेला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतला आहे. याबाबतचे आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाचे कार्यासन अधिकारी महेश कानडे यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले आहेत. दरम्यान, हिंगोली जिल्ह्यासह राज्यभरात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असावा, असा कयास लावला जात आहे.

Web Title: Postponement of ineligible ration card search operation