खून प्रकरणातील आरोपींना पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 00:56 IST2018-11-07T00:55:47+5:302018-11-07T00:56:11+5:30
वसमत तालुक्यातील वाई गोरखनाथ येथील मयत नागराज खंदारे या युवकाचा मटक्याच्या पैशातून खून झाला होता. प्रतीक्षेनंतर चार दिवसांनी खुनाचा गुन्हा पाच जणांविरूद्ध दाखल करण्यात आला होता. चार जणांना अटक करून वसमत न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून मुख्य आरोपी अद्याप फरार आहे.

खून प्रकरणातील आरोपींना पोलीस कोठडी
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरूंदा : वसमत तालुक्यातील वाई गोरखनाथ येथील मयत नागराज खंदारे या युवकाचा मटक्याच्या पैशातून खून झाला होता. प्रतीक्षेनंतर चार दिवसांनी खुनाचा गुन्हा पाच जणांविरूद्ध दाखल करण्यात आला होता. चार जणांना अटक करून वसमत न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून मुख्य आरोपी अद्याप फरार आहे.
चौंढी रेल्वेस्टेशन येथे मटक्याचा जुगार बिनधास्तपणे सुरू होता. मयत नागराज खंदारे याने मटका लावला होता. मटका लागल्याने मयत हा वाई गोरखनाथ येथून चौंढी रेल्वेस्टेशन येथे मटका एजंटाकडे पैसे मागण्यास आला होता. त्यातून मटका एजंटासोबत वाद झाल्याने पाच जणांनी मिळून लाथाबुक्क्याने मारहाण केली. त्यात नागराजचा जागीच मृत्यू झाला व दिशाभूल करण्याच्या उद्देशाने प्रेत बाजूला टाकून दिले. हे प्रकरण ३१ आॅक्टोबर रोजी रात्री ८ ते ९ च्या दरम्यान घडले होता. १ नोव्हेंबर रोजी संशयास्पद प्रेत सापडले होते. त्याच दिवशी संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चार दिवसानंतर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. यात पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला होता.
चार जणांना अटक करून मंगळवारी वसमत न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची म्हणजे ११ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती कुरूंदा पोलिसांनी दिली आहे. यातील मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. मटक्याच्या पैशातून हा खून झाला होता.